नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. एसबीआयने बल्क डिपॉझिटवरील व्याजदर 0.5 ते 1.40 टक्क्यांनी वाढवले आहेत.
सोमावारपासून हे नवे व्याजदर लागू करण्यात आले आहेत.
याआधी एसबीआयने नोव्हेंबर 2017 मध्येसुद्धा बल्क डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले होते.
बल्क डिपॉझिट म्हणजे काय?
बँकेत एकाचवेळी 1 कोटी किंवा त्याहून अधिकची रक्कम डिपॉझिट केल्यास, त्यास बल्क डिपॉझिट म्हणतात. बल्क डिपॉझिटवर बँका नेहमीच ग्राहकांना फायदा होईल, अशा पद्धतीच्या योजना आणतात. विशिष्ट कालावधीनंतर बल्क डिपॉझिटवरील व्याजदरांमध्येही वाढ केली जाते.
आता पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना कॅश बँकेत जमा करण्यासाठी प्रोत्साहन देत, बल्क डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले आहेत.
बल्क डिपॉझिटवरील व्याजदर खूपच कमी होते. बल्क डिपॉझिट रेटना रिटेल डिपॉझिट रेटसोबत जोडण्यात आले आहे, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे एमडी पी. के. गुप्ता यांना दिली.
SBI च्या बल्क डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2018 10:18 PM (IST)
बँकेत एकाचवेळी 1 कोटी किंवा त्याहून अधिकची रक्कम डिपॉझिट केल्यास, त्यास बल्क डिपॉझिट म्हणतात. बल्क डिपॉझिटवर बँका नेहमीच ग्राहकांना फायदा होईल, अशा पद्धतीच्या योजना आणतं. काही कालावधीनंतर बल्क डिपॉझिटवरील व्याजदरांमध्येही वाढ केली जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -