Sri Sri Ravi Shankar: अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar News) यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे तामिळनाडूतील (Tamil Nadu News) इरोड येथे एमरजन्सी लँडिंग करण्यात आलं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याची माहिती मिळत आहे. श्री श्री रविशंकर यांच्याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये आणखी चार जण होते. 


आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर इतर चार लोकांसह हेलिकॉप्टरनं प्रवास करत होते. त्यानंतर खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे सकाळी 10.40 वाजता इरोड येथील सत्यमंगलम येथे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. मात्र, नंतर आकाश निरभ्र झाल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. सुमारे 50 मिनिटांनी हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं.






एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, "आर्ट ऑफ लिव्हिंगचे (Art of Living) श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं आज सकाळी इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, त्यानंतर हवामान सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरनं 50 मिनिटांनी उड्डाण केलं."


श्री श्री रविशंकर बंगळुरूहून तिरुपूरला जाताना इमर्जन्सी लॅडिंग


श्री श्री रविशंकर एका खासगी हेलिकॉप्टरनं बंगळुरूहून तिरुपूरला जात होते. रविशंकर यांच्याशिवाय त्यांचे दोन सहाय्यक आणि पायलट हेलिकॉप्टरमध्ये होते. कदंबूरचे पोलीस निरीक्षक सी वादिवेल कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलं की, "सकाळी 10.15 वाजता हेलिकॉप्टर एसटीआरवरून उड्डाण करत होतं. त्यानंतर खराब हवामानामुळे वैमानिक पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर पायलटनं हेलिकॉप्टरचं युकिनियम येथे इमर्जन्सी लँडिंग केले.


श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प (STR) मधील आदिवासी वस्ती असलेल्या उकिनियम येथे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. घटनास्थळी पोहोचलेल्या कदंबूर पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की, रविशंकर आणि विमानातील इतर तीन जण सुरक्षित आहेत. मात्र, सुमारे 50 मिनिटांनी हवामान सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरनं पुन्हा उड्डाण घेतलं.