Indian Army : भारतीय सैन्य(Indian Army) बदलत्या काळानुसार देशासाठी चांगले बदल स्वीकारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पाकिस्तान (Pakistan) आणि चीनकडून (China) भारताला डिवचण्याचे प्रयत्न सतत होत असता. त्यातच भारतावर सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्याचे प्रमाण देखील वाढत आहे. परंतु पाकिस्तान आणि चीनच्या याच प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि सतत होणाऱ्या सायबर हल्ल्यांना थांबण्यासाठी भारताचे 'स्पेशलिस्ट युनिट' (New Specialist Unit) आता तयार झाले आहे. भारतीय सैन्याच्या सायबर वेलफेअर इनिशिएटिव्ह (Cyber Welfare Initiatives) अंतर्गत या स्पेशलिस्ट युनिटची स्थापना करण्यात आली आहे. 


भारतीय सैन्याचे प्रमुख मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारी सुरक्षा यंत्राणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युनिटमध्ये आधुनिक नेटवर्कची सुरक्षा आणि त्याच्या तयारीच्या स्तराला वाढवण्यासाठी भारतीय सैन्यात 'सायबर ऑपरेशन्स आणि सपोर्ट विंग्स'ची (CCOW) स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे भारताची सायबर सुरक्षेची यंत्रणा आणखी मजबूत होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तसेच या सूत्रांकडून असे देखील सांगण्यात आले की, युद्धांमध्ये हे सायबर स्पेस डोमेन सैन्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. नव्या स्पेशलिस्ट युनिटचे महत्त्व सांगताना हे युनिट शत्रू राष्ट्रांकडून करण्यात येणाऱ्या सायबर युद्धासाठी हे स्पेस डोमेन स्पर्धात्मक असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 


स्पेशलिस्ट युनिट सुरक्षेच्या कामांमध्ये मदत करणार


नव्या सायबर युनिटची स्थापना ही भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तसेच हे युनिट भारतीय सैन्यासाठी आवश्यक असलेल्या सायबर सुरक्षेच्या कामांसाठी देखील मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आत्मासात करुन सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी तसेच उत्तम तत्त्वज्ञान विकसित करण्यासाठी देखील या युनिटची मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  


भारतीय सैन्याच्या बैठकीत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेचे आणि तत्परतेचे मुल्यांकन करण्यात आले. तसेच या परिषदेत लष्कराचे भविष्य घडवणारे महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. भारताच्या उत्तरेकडील भागात सध्या तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याने भारत आणि चीनच्या सीमेवर अधिक सतर्क राहण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. तसेच कोणतेही संदर्भ न घेता संरक्षण मंत्र्यांनी जगभरात बदल होत असलेल्या भौगोलिक परिस्थितीवरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यानुसार लष्कराने आपल्या हालचाली कराव्यात असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 
 
इतर महत्त्वाची बातमी: 


Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकसाठी भाजप सज्ज; सहा दिवस 22 रॅली, स्टार प्रचारकांची फौज, पंतप्रधानांच्या सभांचा धडाका