Solapur :   जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया आज पार पडली. दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. परवा म्हणजे 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आज झालेल्या मतदानावेळी सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सुरु केले बेमुदत आंदोलन सुरु केलं होतं. तब्बल दोन तासानंतर खासदार आणि आमदारांनी आंदोलन थांबवलं आहे. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

कार्यकर्त्यांच्या मारहाणी विरोधात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव यांचे दोन तासाहून अधिक काळ पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरु होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर आमदार खासदारांनी आंदोलन थांबवले आहे. निलेश तुपे या तरुणाला सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्याकडून मारहाण झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी आंदोलन सुरु केले होते. दोन तासानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे. 

वेळापूर पोलीस ठाणे आणि येथील अधिकारी भाजपच्या दबावात काम करत असल्याचा आरोप

वेळापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी मंगेश तुपे या तरुणाला मारहाण केली. यानंतर आमदार उत्तम जाणकार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक होऊन थेट पोलीस ठाण्यात आंदोलनात बसले होते. तब्बल दोन तासाच्या आंदोलनानंतर संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांची तात्काळ बदली करून निलंबित करण्याच्या आश्वासनानंतर आमदाराने खासदारांचे आंदोलन थांबले आहे. आमदार व खासदार यांनी वेळापूर पोलीस ठाणे आणि येथील अधिकारी भाजपच्या दबावात काम करत असल्याचा आरोपही या निमित्ताने केला. प्रसंबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठवणार असल्याचा खुलासा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान सुरु

दरम्यान, राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज (7 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरु आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.