Shraddha Murder Case : श्रद्धा वालकरच्या हत्येतील मुख्य आरोपी आफताब पूनावाला ( aftab poonawalla) याची सोमवारी म्हणजे 28 नोव्हेंबर 2022 रोजी नार्को चाचणी (narco test) केली जाऊ शकते. आफताबच्या नार्को टेस्टसाठी दिल्ली सरकारच्या न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने तयारी देखील पूर्ण केली आहे. आंबेडकर रुग्णालयात नार्को टेस्टसाठी स्वतंत्र विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. या चाचणीदरम्यान पाच सदस्यांची टीम उपस्थित राहणार आहेत. या टीममध्ये आंबेडकर हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांचा देखील समावेश असणार आहे. 


पाच सदस्यांच्या टीममध्ये एक भूलतज्ज्ञ आणि एक फिजिशियन असतील. यातील फिजिशियन आफताबच्या शरीराच्या पॅरामीटर्सवर लक्ष ठेवतील. याशिवाय एफएसएलचे दोन मानसशास्त्रज्ञ आणि एक फॉरेन्सिक फोटोग्राफर असणार आहे. या संपूर्ण चाचणीची फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. हाच महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला जाईल.  


 या पूर्वी आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाली आहे. नार्को टेस्टमध्येही पॉलीग्राफ टेस्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते तेच प्रश्न पुन्हा विचारले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कारण आफताबने नार्को चाचणीत दिलेल्या उत्तरांची तुलना पॉलीग्राफ चाचणीत दिलेल्या उत्तरांशी केली जाईल जेणेकरून आफताबने कोणतीही बनावट उत्तरे दिली नसल्याचे स्पष्ट होईल.


नार्को टेस्टसाठी आफताबचे तिहार तुरुंगात मेडिकलही झाले आहे. आता त्याला नार्को टेस्टसाठी कारागृहातून आणण्यासाठी पोलिस पुन्हा एकदा परवानगी घेणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियनेतर सोमवारी सकाळी नार्को टेस्टची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. ही चाचणी पूर्ण होण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लागण्याची शक्यता आहे. या टेस्टनंतर श्रद्धा हत्याकांडाचे संपूर्ण सत्य येणार बाहेर येण्याची शक्यता आहे. 


 आफताबवर त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा वॉलकरच्या हत्येचा आरोप आहे. आफताब पूनावाला याने 27 वर्षीय श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे 35 तुकडे त्याने दिल्लीतील मेहरौली येथील घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर अनेक दिवस ते जंगलात फेकून दिले. या हत्येप्रकरणी आफताब सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली न्यायालयाने आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Shraddha Murder Case : फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे अन् आफताब दुसऱ्या तरुणीसोबत; कोण होती ही तरुणी? ओळख पटली