नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. यावर मात करण्यासाठी बहुतांश राज्यांनी लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता वर्तविली आहे. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की अधिकाधिक लोकांचे लसीकरण केल्यास या विषाणूवर नियंत्रण मिळवता येईल. लसीबाबतचे सर्व प्रश्न देशभरातील लोकांच्या मनात फिरत आहेत. अशा परिस्थितीत आपण आज काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.


ही लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) कोरोना लस गर्भवती महिलांसाठी धोकादायक असल्याचे आतापर्यंत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. अशा परिस्थितीत, जर गर्भवती महिला निरोगी असेल ती कोरोना लस घेऊ शकते. जर त्यांना लसीबद्दल काही शंका असेल तर आपण आपल्या डॉक्टरांशी याबद्दल चर्चा करू शकता. त्यांच्या सल्ल्यानुसार, आपण लस घ्या.


लसीकरणानंतर स्तनपान करता येऊ शकतं का?
अद्याप लसीचा कोणताही परिणाम स्तनपानच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं आहे. अशात लस घेतल्यानंतर कोणतीही समस्या नसल्यास महिला स्तनपान देणे चालू ठेवू शकतात.


अशा लोकांना लसी घेऊ नये
डब्ल्यूएचओच्या मते, जे लोक गंभीर अॅलर्जीच्या समस्येने ग्रस्त आहेत, त्यांनी लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला सध्या कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तुम्ही आत्ताच लस घेऊ नये. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणताही गंभीर आजार असल्यास लस घेण्यापूर्वी तज्ञाचे मत घ्या.


गेल्या 24 तासांत 4092 रुग्णांचा मृत्यू
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत आहे. भारतात दिवसाला जवळपास 4 हजार रुग्णांचा मृत्यू होतोय. तसेच देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची देशात नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 403,738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4092 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,86,444 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 401,078 नव्या कोरोनाबाधितांचं देशात निदान झालं होतं.