Continues below advertisement

नवी दिल्ली: अमेरिकेने (USA) भारतावर आयातीत वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ (Tariff) लावल्याने निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर काँग्रेस (Congress) खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यावर एक सल्लाही दिला आहे. भारताने उत्पादन क्षेत्राऐवजी (Manufacturing Sector) पर्यटन क्षेत्रावर (Tourism Sector) भर द्यावा, जेणेकरुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल असं शशी थरुर म्हणाले.

सिंगापूर (Singapore) दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर थरूर यांनी तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील पत्रकार परिषदेत सांगितले की, “ऑटोमेशन (Automation) मुळे उत्पादन क्षेत्रात मर्यादित रोजगार (Jobs) उपलब्ध होणार आहेत. परंतु पर्यटन क्षेत्रात अकुशल आणि अर्धकुशल युवकांसाठी रोजगार निर्माण होऊ शकतात.”

Continues below advertisement

दुबईसिंगापूर मॉडेल (Dubai Singapore Tourism Model)

थरूर यांनी उदाहरण देत सांगितले की, दुबई आणि सिंगापूर हे भारतापेक्षा लहान देश असूनही तेथे भारताच्या तुलनेत 10 ते 20 पट जास्त पर्यटक जातात. त्यामुळे भारताने पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय प्राथमिकता द्यावी, जास्त हॉटेल्स बांधावीत आणि सुविधा वाढवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅरिफचा परिणाम: रोजगार संकट (US Tariff Impact on Jobs)

गुजरातमधील सूरत येथे टॅरिफमुळे एका लाखाहून अधिक रोजगार गमावल्याचे उदाहरण देत थरूर म्हणाले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी पर्यटनच सर्वात मोठा पर्याय आहे.

केंद्र सरकारचे बजेट प्रोत्साहन (Tourism in Union Budget 2025-26)

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये पर्यटन क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. 2023 मध्ये पर्यटनातून तब्बल 7.6 कोटी रोजगार निर्माण झाले होते. सरकारने 2541.06 कोटी रुपये पर्यटनातील पायाभूत सुविधा, स्किल डेव्हलपमेंट आणि प्रवास सुविधा सुधारण्यासाठी मंजूर केले आहेत. तसेच देशातील 50 टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन विकसित करण्याची योजना आहे.

नवीन योजना आणि सुविधा (Tourism Schemes and Incentives)

याशिवाय मुद्रा लोन, कनेक्टिव्हिटी सुधारणा, आणि परफॉर्मन्स-आधारित प्रोत्साहन यांचाही यात समावेश आहे. शशी थरूर यांच्या मते, योग्य नियोजन आणि गुंतवणुकीद्वारे पर्यटन क्षेत्र भारताच्या रोजगार संकटावर प्रभावी उपाय ठरू शकते.