Sharad Yadav passes away : माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन (Sharad Yadav passes away) झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यान सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शरद यादव हे भारतीय राजकारणातील एक अनुभवी नेते होते. एकूण सात वेळा ते लोकसभेला (Loksabha) निवडून आले होते. शरद यादव यांच्या नावावर आजही एक विक्रम कायम आहे. तो म्हणजे तीन वेगवेगळ्या राज्यांमधून (Three Different States) लोकसभा निवडणूक जिंकणारे शरद यादव हे पहिलेच राजकीय नेते होते.


या तीन राज्यातून शरद यादव यांनी लढवली होती निवडणूक


शरद यादव हे तीन राज्यातून लोकसभा निवडणूक जिंकून आले होते. तीन राज्यात निवडणूक लढवून जिंकून येणारे शरद यादव हे ऐकमेव नेते आहेत. शरद यादव यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या जागेवर ते खासदार झाले होते. यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील बदायू लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. या ठिकाणाहून ते निवडून आले होते. तसेच बिहारमधील मधेपुरा मतदारसंघातूनही निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला होता. 


शरद यादव यांनी लालूप्रसाद यादव यांचाही  केला होता पराभव 


शरद यादव हे लोकसभेचेच खासदार राहिलेले नाहीत, तर ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. ते एकूण 7 वेळा लोकसभेला निवडून आले आहेत. याशिवाय त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात विविध खात्यांचा पदभार देखील सांभाळला होता. शरद यादव यांनी लालूप्रसाद यादव यांचाही निवडणुकीत पराभव केला होता. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव आणि शरद यादव मधेपुरा मतदारसंघात आमनेसामने होते. त्यावेळी लालूप्रसाद यादव यांची लोकप्रियता खूप जास्त होती. अशा स्थितीतही शरद यादव यांनी त्यांचा पराभव केला होता.


1974 मध्ये शरद यादव पहिल्यांदा खासदार 


शरद यादव यांनी 1974 साली पहिली निवडणूक लढवली होती. दिंवगत जयप्रकाश नारायण यांच्या सांगण्यावरून ते जबलपूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांनी पहिलीच निवडणूक जिंकली होती. यानंतर 1977 मध्येही त्यांनी याच जागेवरून निवडणूक लढवली आणि संसदेत पोहोचले होते. शरद यादव यांनी 1989 मध्ये तिसरी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील बदाऊनमधून लढवली होती, येथेही ते विजयी झाले. 1991 मध्ये त्यांनी बिहारमधील मधेपुरा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा ते विजयी झाले. 1996, 1999 आणि 2009 मध्येही या जागेवरून त्यांचा विजयी सिलसिला कायम राहिला. याशिवाय ते 1986, 2004 आणि 2014 मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Sharad Yadav Demise: समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ हरवला, शरद यादव यांना दिग्गजांकडून श्रद्धांजली