Heatwave In March : यंदा मार्चमध्ये विक्रमी उष्णता जाणवू शकते. या काळात तापमान 38 ते 40 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवस आणि रात्रीच्या तापमानात असामान्य वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये प्रचंड उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. 2022 मध्येही मार्च महिन्यात प्रचंड उष्णतेमुळे गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारला गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली होती. दिल्लीतही फेब्रुवारी महिन्यातील उष्णतेने 74 वर्षांचा विक्रम मोडला आहे. IMD नुसार, सफदरजंगमध्ये 27 फेब्रुवारी रोजी किमान तापमान 19.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे 1951 ते 2025 या कालावधीतील या महिन्यातील सर्वोच्च तापमान आहे.

हिमाचल प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून बर्फवृष्टी 

दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. लाहौल स्पिती, चंबा आणि किन्नौर जिल्ह्यातील पांगी-भरमौरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीला सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुल्लूच्या आखाडा मार्केटमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं. त्याचवेळी नाल्याला पूर आल्याने अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबली गेली. गंगोत्री, उत्तराखंडमध्ये 4 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. मुसळधार बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. उधमपूरच्या पलीकडचे रस्ते बंद आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात ट्रक, बस आणि प्रवासी वाहने अडकून पडली आहेत.

मध्य प्रदेशात 4 मार्चपासून हवामान बदलू शकते

दुसरीकडे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-उत्तर भारतात २ मार्चपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. विशेषत: 4 मार्चपासून इंदूर, ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काही ठिकाणी हवामान बदलू शकते. याआधी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या