नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या सत्तेचा फैसला उद्या होणार आहे. शनिवारी 19 मे रोजी म्हणजे उद्याच बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश सर्वोच्च न्यायालयाने भाजप आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दिला आहे.
कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठाने दीर्घ युक्तीवाद आणि सुनावणीनंतर हा निकाल दिला आहे.
तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी आणि भाजपकडून मुकुल रोहतगी बाजू मांडली.
कोर्टात नेमकं काय घडलं?
बहुमत चाचणीदरम्यान गुप्त पद्धतीने मतदान होणार नाही. मतदान कोणत्या पद्धतीने करायचं याचा निर्णय हंगामी अध्यक्ष घेतील : सुप्रीम कोर्ट
उद्याच चार वाजता बहुमत सिद्ध करा, 15 दिवसांची मुदत मागणाऱ्या भाजपला सुप्रीम कोर्टाचा आदेश
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : बहुमत चाचणीसाठी सुप्रीम कोर्टाने किमान सोमवारीपर्यंतचा वेळ द्यावा, काँग्रेस-जेडीएस आमदार राज्याबाहेर आहेत. त्यांनाही मतदानासाठी यावं लागेल, त्यामुळे थोडी मुदत द्यावी : मुकुल रोहतगी
LIVE : बहुमत उद्याच सिद्ध करा, येडियुरप्पांना सुप्रीम कोर्टाचे आदेश
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : बहुमत सिद्ध करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही, थोडा वेळ द्यावा, भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी बहुमत चाचणीसाठी मुदत मागितली
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : बहुमत सिद्ध झाल्याशिवाय आमदार म्हणून अँग्लो इंडियन सदस्याची शिफारस करु नये : सुप्रीम कोर्ट
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : संधी मिळाली तर काँग्रेस-जेडीएस उद्याच बहुमत सिद्ध करेल : अभिषेक मनु सिंघवी
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : शनिवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य व्यवस्था आणि सुरक्षा पुरवण्याचे निर्देश कर्नाटक डीजीपींना देऊ : सुप्रीम कोर्ट
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : येडियुरप्पांनी पाठिंब्याचा दावा केला आहे, परंतु त्यांच्याकडे आमदारांच्या पाठिंब्याची पत्र नाहीत. जर भाजपकडे पाठिंब्याचं पत्र असेल तर मुकुल रोहतगींनी ती दाखवावीत : काँग्रेस-जेडीएसचे वकील अभिषेक मनु सिंघवी
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : आता दोन पर्याय आहेत. एकतर राज्यपालांच्या निर्णयावर विस्तृत सुनावणी करायची किंवा उद्याच बहुमत सिद्ध करायचं : सुप्रीम कोर्ट
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : हाच तर प्रश्न आहे. आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा येडियुरप्पांनी केला आहे. पण राज्यपालांनी कशाच्या आधारावर भाजपला पहिल्यांदा सत्ता स्थापनेची संधी दिली. हा सगळा खेळच आकड्यांचा आहे. म्हणूनच हा पेच निर्माण झाला आहे : न्यायमूर्ती ए के सिक्री
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : निवडणुकीआधी कोणतीही आघाडी नव्हती. राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित केलं. येडियुरप्पा सभागृहात बहुमत सिद्ध करतील. काँग्रेस-जेडीएस आमदारांकडूनही समर्थन मिळेल. यापेक्षा जास्त बोलू शकणार नाही : मुकुल रोहतगी
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं पत्र कोर्टाकडे सोपवलं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
येडियुरप्पांचा उद्या फैसला : सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 May 2018 12:07 PM (IST)
तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी आणि भाजपकडून मुकुल रोहतगी बाजू मांडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -