नवी दिल्ली : देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरीस दारुची दुकांन हटवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच महामार्गांवर दारुच्या विक्रीवरही सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे आता हायवेवर दारु मिळणार नाही .
सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हरियाणासह सर्व राज्यामधील महामार्गांवरील दारुची दुकानं हटवण्यास सांगितलं आहे.
मात्र यापुढे माहामार्गांवर दारुच्या दुकानांसाठी नवे परवाने मिळणार नाहीत. तसंच परवाने रिन्यू करुनही मिळणार नाही. त्यामुळे परवाना असेपर्यंत दुकानं सुरु राहतील.
हायवेवरील दारुची दुकानं हटवण्याची मुदत 1 एप्रिल निश्चित केली आहे. बहुतांश परवान्याची मुदत 31 मार्चपर्यंत असते.