Sanjay Raut : देशात बेरोजगारी (Unemployment) वाढल्याने तरुणांनी संसदेत घुसखोरी केलयाचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. रामलल्लांचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, असा घणाघात  संजय राऊतांनी सरकारवर केला. राज्य सरकार भांडवलदार, उद्योगपतींची दलाली करत आहे. दरम्यान, धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपवर संजय राऊतांनी सडकून टीका केली. 


 मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री कोणाची दलाली करतायेत


देशातील मुख्य मुद्दा हा बेरोजगाराचा आहे. शेतकरी कर्जबाजारी होतोय यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी तोडगा द्यावा असे संजय राऊत म्हणाले. काल धारावीत जो शिवसेनेचा मोर्चा निघाला त्याची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चेष्ठा केली. तुम्ही कोणाची दलाली करताय, उद्योगपतीची, असे म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. ही मुंबई भांडवलदारांच्या घशातून वाचवण्यासाठी 106 जणांनी बलिदान दिलं असल्याचे राऊत म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं मराठीपण दिल्लीच्या पायाशी गुंडाळून ठेवलं


मुंबई मराठी माणसांची आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं मराठीपण दिल्लीच्या पायाशी गुंडाळून ठेवल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना मुंबईच्या विकासाशी कधीही आड येत नाही. मुख्यमंत्री काल बोलले मोर्चातील लोक हे बाहेरुन आले आहेत. हो लोक चंद्रावरुन आणले होते असे राऊत म्हणाले. दरम्यान, कालचा मोर्चा हा इशारा मोर्चा होता असेही राऊत म्हणाले. युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 


हिवाळी अधिवेशनातही पडसाद


मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्याला विरोध दर्शवत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान भावनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. यावेळी अदानी-मोदानी हटाव, अदानीला सुटलीय धारावीची हाव, धारावीकर म्हणताय अदानी चले जाव!, आज धारावी, उदया मुंबई,  धारावी वाचवा, लघु उद्योग वाचवा, आदानीला सूट, धारावीची लूट अशा आशयाचे बॅनर झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. आज धारावीमध्ये हजारो लोक लघु उद्योग करत आहे.  धारावी पुनर्विकासाच्या नावावर सरकार आदानीच्या फायद्याचे काम करत असून येथील जनतेवर अन्याय करत आहे.  म्हणून या मुद्यावर आम्ही विधान भवनाच्या आत आणि बाहेर आमच्या लढा देत आहोत. दोन्ही सभागृहात या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातील आणि धारवीकरांना न्याय मिळवून दिला जाईल. असे अंबादास दानवे म्हणाले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


'विधानसभा अध्यक्ष  डमरु वाजवत बसले', नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा थेट हल्लाबोल; म्हणाले...