Sabarmati Express : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे साबरमती एक्सप्रेस (Sabarmati Express,19168) रुळावरून घसरली. 22 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. कानपूर शहरापासून 11 किमी अंतरावर भीमसेन आणि गोविंदपुरी स्थानकांदरम्यान पहाटे 2.35 वाजता हा अपघात झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाटणा-इंदूर एक्स्प्रेस अपघाताच्या 1 तास 20 मिनिटे आधी ट्रॅकवरून गेली होती, तोपर्यंत ट्रॅक सुरक्षित होता. अपघातानंतर 16 गाड्या रद्द करण्यात आल्या. 10 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वेचे म्हणणे आहे की, ते 24 तासांत ट्रॅक क्लिअर करतील. 






रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेचे इंजिन रुळावर ठेवलेल्या जड वस्तूला धडकले. इंजिनवर टक्करच्या खुणा आहेत. पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आयबी आणि यूपी पोलीस तपास करत आहेत. उत्तर मध्य रेल्वेचे जीएम उपेंद्र चंद्र जोशी म्हणाले की, काहीतरी आदळल्याने हा अपघात झाल्याचे निश्चित आहे. घटनास्थळी काहीही आढळून आले नाही.






अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग 70 ते 80 च्या दरम्यान होता. एक चाक बंद पडताच दाब कमी झाला. चालकाने वेळीच आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, दोषींवर कठोर कारवाई करू. कानपूरचे पोलिस आयुक्त अखिल कुमार घटनास्थळी पोहोचले. जवळच्या लोकांची चौकशी केली. ट्रॅकचा तुकडाही पाहिला. हा तुकडा रुळावर ठेवण्यात आल्याचा संशय आहे, त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली. अपघातामुळे रुळ उखडले होते. लोखंडी क्लिप निखळून पडल्या आहेत. 


चालू वर्षातील रेल्वे अपघात 



  • 28 फेब्रुवारी 2024 - झारखंडच्या जामतारा-कर्मातांड येथे कालाझारियाजवळ ट्रेनने धडक दिल्याने किमान दोन जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

  • 15 जून 2024 - एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये स्लीपर कोच (S6) च्या खालच्या बर्थवर झोपलेल्या केरळमधील 62 वर्षीय व्यक्तीचा प्रवासीसह वरचा बर्थ अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. वरच्या बर्थच्या प्रवाशाने चुकीच्या साखळीमुळे हा अपघात झाल्याचे रेल्वेने घोषित केले, तर जखमी खालच्या बर्थ प्रवाशाला तेलंगणा राज्यातील रामागुंडम येथील जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे नंतर शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

  • 17 जून 2024 - पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकापासून अंदाजे 10 किमी अंतरावर दार्जिलिंग जिल्ह्यातील रंगपानी रेल्वे स्थानकाजवळ एका ओव्हरस्पीड मालवाहू ट्रेनने कांचनजंगा एक्सप्रेस (13174) च्या मागील बाजूस धडक दिली. दहा लोकांचा मृत्यू झाला आणि किमान 60 जखमी झाले होते. 

  • 18 जुलै 2024 - दिब्रुगढ-चंदीगड एक्सप्रेस ट्रेनचे 12 डबे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील झिलाही जवळ रुळावरून घसरले. यामध्ये किमान चार ठार आणि 32 जखमी झाले. 

  • 30 जुलै 2024 - झारखंडमधील जमशेदपूरजवळ हावडा-मुंबई सीएसएमटी मेल (नागपूरमार्गे) ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले, परिणामी किमान 20 लोक जखमी झाले आणि 2 जणांचा मृत्यू झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या