मुंबई: 'मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतो, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे.' अशी जोरदार टीका  शिवसेननं आपलं मुखपत्र सामनातून केली आहे.

'देशातला काळा पैसा, बेहिशेबी संपत्ती खतम व्हायलाच पाहिजे! काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. पण मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक यादवी आली आहे', असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून या निर्णयावर सडकून टीका करण्यात आली आहे.

एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:

१२५ कोटी जनता गारद

* काळा पैसा हा आमच्या अर्थव्यवस्थेवरील कलंक आहे. मोदी यांच्या साफसफाई मोहिमेचे आम्ही स्वागत करतोय, पण त्यांनी जो मार्ग त्यासाठी स्वीकारला आहे तो भयंकर अनागोंदीचा आहे. मोदी यांच्या निर्णयानंतर देशात आर्थिक अराजकाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या सवाशे कोटी आहे. हे सर्व लोक भ्रष्टाचारी व काळा पैसावाले आहेत काय? देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय?

* पंतप्रधान मोदी यांनी जपानच्या भूमीवरून जाहीर केले आहे की, ३० डिसेंबरनंतर ते आणखी एक जोरदार धमाका करणार आहेत. पाचशे-हजारच्या नोटा अचानक रद्द करून त्यांनी हिंदुस्थानच्या सवाशे कोटी जनतेवर आर्थिक अराजकाचा बॉम्ब आधीच टाकला आहे. या बॉम्बहल्ल्यात विव्हळणार्यान जनतेला सॅल्यूट करीत त्यांनी सांगितले की, ३० डिसेंबरनंतर आणखी एक धमाका करू! बहुधा पंतप्रधान पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून दहशतवादाचा कारखाना दाऊदसह बेचिराख करण्याच्या विचारात असावेत. नाही तरी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच सांगून टाकले आहे की, पाकिस्तानवर आम्ही अणुबॉम्ब टाकू. बहुधा हाच धमाका ३० डिसेंबरनंतर होईल.

* अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार व्हायला आता फक्त २०-२५ दिवसांचा अवकाश आहे असे देशातील जनतेने समजायला हरकत नाही. ज्याप्रमाणे एका रात्रीत पाचशे-हजारच्या नोटा रद्द करण्याचे सिक्रेट मिशन मोदी यांनी तडीस नेले त्याचप्रमाणे ३० डिसेंबरनंतर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू केल्याची घोषणा होईल. कश्मीरातील ३७० कलम हटवून ‘एक राष्ट्र, एक निशाण’चे स्वप्न साकार होईल. ३० डिसेंबरच्या मध्यरात्री अयोध्येत राममंदिर उभारणीच्या घोषणेचा धमाकाही होऊ शकतो. देशवासीयांनी ३० डिसेंबरनंतरच्या या धमाक्याची वाट पाहायला हवी.

* पाचशे-हजारच्या नोटा एका क्षणात रद्द केल्याने जनता त्यांना आशीर्वाद देत आहे. मोदीजी, जनतेचे आशीर्वाद इतके स्वस्त आहेत काय? दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाची परतफेड जनतेला असे रस्त्यावर आणून केली काय? हा सरळ सरळ विश्वासघात आहे. मूठभर उद्योगपतींकडील काळे धन बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने सवाशे कोटी जनतेला रस्त्यावर आणले. अन्नपाण्याशिवाय उन्हात तडफडायला व मरायला लावले. काळा पैसा संपविण्यासाठी केलेला हा प्रयोग अघोरी आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर आहे.

* देशातला काळा पैसा सवाशे कोटी मध्यमवर्गीयांकडे नसून देशाच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत अशा १२५ घराण्यांकडे व राजकारण्यांकडे आहे. यापैकी किती लोक हजार-पाचशेच्या नोटांची बंडले घेऊन रांगेत उभे आहेत? त्यांचा पैसा परदेशी बँकांत सुरक्षित आहे व मोदी यांचा निर्णय होण्याआधीच या पैशाला परदेशाचे पाय फुटले असतील तर या लोकांवर काय कारवाई झाली? २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जो प्रचंड काळा पैसा फिरवला आणि जिरवला गेला त्याचा हिशेबही आता द्यावाच लागेल. पंतप्रधान मोदी देशात कमी आणि परदेशातच जास्त फिरतात अशी टीका त्यांचे विरोधक करतात. आताही मोदी जपानलाच होते. पंतप्रधान परदेशात सतत फिरतात ते जनतेच्या कष्टाच्या पैशांवर आणि त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहून नोटा बदलाव्या लागलेल्या नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे.

* लोकांना स्वत:च्या हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी चार-चार दिवस झगडावे लागत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट होईल. देशातील वातावरण असे संवेदनशील झाले आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात की, आणखी दोन-तीन आठवडे परिस्थिती पूर्ववत होण्यास लागतील. त्यांनी असेही सांगितले की, घाबरू नका, नव्या नोटा भरपूर आहेत. मात्र हे झूठ आहे. फक्त दोन हजारांसाठी लोकांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. खून, मारामार्याग, चोर्यां चे प्रमाण वाढले आहे व यालाच यादवी म्हणतात. देशात सध्या आर्थिक यादवीच निर्माण झाली आहे आणि देशातील १२५ कोटी जनता यात गारद होणार असे भयंकर चित्र दिसत आहे. मूठभर लोकांच्या हातात आजही देशाची आर्थिक सत्ता कायम आहे. त्यांच्या मुठीत गुदमरलेला देश कधी मुक्त होणार? उद्याच्या निवडणुका त्याच मूठभर लोकांच्या पैशांवर पुन्हा लढवल्या जातील व सत्ता मिळवली जाईल. त्यांना आजही पूर्ण संरक्षण रोकड्यात आहे, पण गरीब जनता, मजूर, शेतकरी हवालदिल होऊन रस्त्यांवर आहे.

* पंतप्रधानांनी त्यांचा आक्रोश समजून घ्यावा. भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काळा पैसा हा कॅन्सर आहे. त्याने देश पोखरला जात आहे हे खरेच, पण आज पाचशे-हजारच्या नोटा तुम्ही अचानक रद्द केल्याने जी सवाशे कोटी जनता उन्हात अन्नपाण्याशिवाय तडफडते आहे ती तुमच्या पाठीशी राहणार आहे काय?

संबंधित बातम्या:

सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ

500-1000च्या जुन्या नोटांचं आरबीआय करणार तरी काय?

बँकेत पैसे जमा करताच थेट आयकर विभागाला माहिती

पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी

कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य

लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी

एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती

नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स

बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते!

बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार

सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही

सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक

मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार

500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला

एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी

टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप

आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक

देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प

कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द