Mohan Bhagwat New York: अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित 'एक जग, एक मानवता' (Universal Oneness Celebration) परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी एक महत्वपूर्णवक्तव्यकरतजगालाएकटेच प्रभावी संदेश दिला. मोहन भागवत यांनीआपल्याभाषणातसांगितलं की, जर जर एखाद्या व्यक्तीचा असा विश्वास असेल की भारतात मुस्लिमांचे (Muslim) अस्तित्व नसावे, तर ती व्यक्ती स्वतःला हिंदू म्हणवू शकत नाही. जगभरातील धार्मिक नेत्यांमध्ये बोलताना, आरएसएस प्रमुखांनी स्पष्ट केले की, सर्व धर्म एकाच देवाकडे घेऊन जातात, ही श्रद्धा हिंदू (Hindu) असण्याची प्राथमिक अट आहे. त्यांनी यावर जोर दिला की, माणसांमध्ये कोणताही भेदभाव असू शकत नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर हाच मानवतेचा खरा पाया आहे. असेहीतेम्हणाले. (Mohan Bhagwat at New York)
Mohan Bhagwat : अमेरिका आणि भारताच्या डीएनए मध्येच एकता आणि विविधता
'भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या 'डीएनए'मध्ये (मूलभूत रचनेत) एकता आणि विविधता सामावलेली आहे,' असे प्रतिपादन करत मोहन भागवत यांनी दोन देशांमध्ये साम्य असल्याचेही अधोरेखित केले. अमेरिकेच्या संदर्भात 'बहुविधता' (plurality) हा शब्द अनेकदा वापरला जातो, असे नमूद करून ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा आपण भारताचा विचार करतो, तेव्हा 'विविधतेतील एकता' ही संकल्पना चर्चेत येते. ही एकता आणि ही विविधता, या दोन्ही गोष्टी त्यांच्या डीएनएचा भाग आहेत'. शनिवारी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' (जागतिक एकात्मता उत्सव) असे नाव असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन 'अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग' (AHEAD) या गटाने केले होते. एका अर्थपूर्ण आणि तत्त्वज्ञानात्मक भाषणात भागवत पुढे म्हणाले, 'राष्ट्र ही केवळ भौगोलिक अस्तित्वे नसतात. या विश्वाच्या रचनेत राष्ट्रांना एक विशिष्ट कर्तव्य पार पाडावे लागते. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, प्रत्येक राष्ट्राला एक नियती किंवा ध्येय पूर्ण करायचे असते. भारताच्या वाट्याला आलेली नियती काय आहे? तर, 'विविधतेतील एकता' हे तत्त्व स्वतः अनुभवणे आणि वेळोवेळी जगाला त्याची जाणीव करून देणे, हे भारताचे कार्य आहे. आपण एक आहोत आणि विविधतेमुळेच त्या एकत्वाला अधिक शोभा प्राप्त होते."
Mohan Bhagwat : 'धर्म वेगवेगळे असू शकतात, पण मानवता एक आहे'
आपल्या भाषणात मोहन भागवत पुढे म्हणाले की, 'मी अशा समाजासाठी काम करत आहे, जो पारंपरिकरित्या मानतो की धर्म वेगवेगळे असू शकतात, पण मानवता एक आहे. सत्य एकच आहे. मानवता हे त्या सत्याचेच फळ आहे. म्हणूनच, मानवता एक आहे. सत्य एकच आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त आणि स्पष्ट केले जाते. आपण मानव आपल्याच अनुभवांचे आणि मर्यादांचे कैदी आहोत'. असेहीतेम्हणाले.
Mohan Bhagwat : जर आपण समाजाला एकजूट केले नाही, तर त्यामुळे दिशाभूल होते
मोहन भागवत पुढे म्हणाले की, 'जर आपण समाजाला शिक्षित केले नाही, तर त्यामुळे समाजाची दिशाभूल होते. इतिहासात हे कसेतरी घडले तो क्षण मी निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यानंतर, आपला समाज, आपला देश परकीय हल्ल्यांचे लक्ष्य बनला आणि अनेक गोष्टी गमावल्या गेल्या.
Mohan Bhagwat : 'ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी धार्मिक विधींचे पालन करणे आवश्यक'
जगात अनेक धर्म आहेत. आज धर्मांची ओळख प्रामुख्याने त्यांच्या धार्मिक विधींवरून होते. धार्मिक शिस्त अंगीकारण्यासाठी आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या त्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी धार्मिक विधींचे पालन करणे देखील आवश्यक आहे. असेहीमोहन भागवत म्हणाले.
