मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची ट्विटरवर एन्ट्री झाली आहे. मोहन भागवत यांच्यासोबत संघाचे इतर ज्येष्ठ पदाधिकारी देखील ट्विटरवर सक्रिय झाले आहेत.


मोहन भागवत ट्विटरवर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फॉलो करत आहेत. संरसंघचालकांनी अद्याप एकही ट्वीट केलेलं नाही. @DrMohanBhagwat हे मोहन भागवत यांचं ट्विटर यूजर नेम आहे.



मोहन भागवत यांनी मे महिन्यातच ट्विटर जॉईन केलं होतं, मात्र जून महिन्यात त्यांचं अकाऊंट व्हेरिफाईड झालं आहे. सध्या मोहन भागवत यांना 12 हजारांहून अधिक यूजर्स फॉलो करत आहेत आणि ही संख्या वाढत आहे.


आरएसएसचे ट्विटरवर जवळपास दीड मिलियनहून फॉलोअर्स आहेत. आरएसएसचं ट्विटर अकाऊंटही कोणालाच फॉलो करत नाही. आरएसएसने जवळपास 1100 ट्वीट केले आहेत. आरएसएसने जून 2011 मध्ये ट्विटर जॉईन केलं आहे.


मोहन भागवत यांच्यासोबत सरकार्यवाह सुरेश जोशी, सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, व्ही भगैया यांनी देखील ट्विटर जॉईल  केलं आहे.