Rohit Pawar: 'दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात? दादा त्यांचे मित्र होते, अमित शाह, नरेंद्र मोदींनी यात लक्ष घातलं पाहिजे' दिल्लीतून रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे?
दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात? दादा त्यांचे मित्र होते, अमित शाह, नरेंद्र मोदींनी यात लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

Rohit Pawar on Ajit pawar Plane Crash: VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान (Conspiracy) असू शकते आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे, कारण यात गुंतलेले इतर लोकही तितकेच प्रभावशाली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्या राजीनाम्यासाठी मी पंतप्रधान मोदींना ईमेलच्या माध्यमातून पत्र पाठवलं आहे. राहुल गांधी यांनीही हा विषय आपल्या हाती घ्यावा आणि या मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आम्हाला साथ द्यावी, असेही ते म्हणाले.
दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?
दरम्यान, रोहित पवार यांनी दिल्लीत मोठं वक्तव्य केलं आहे. दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात? असा थेट सवाल त्यांनी दिल्लीत केल्याने त्यांचा नेमका रोख कोणाकडे? असा सवाल उपस्थित झाला आहे. दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात? दादा त्यांचे मित्र होते, अमित शाह, नरेंद्र मोदींनी यात लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. ते पुढे म्हणाले की, मुंबईत या कंपनीने नवं विमान सिंगापूरहून विकत घेऊन आणलं तेव्हा नारळ फोडायला एक मोठे नेते गेले होते. अजित पवारा त्यांचे मित्र होते हे लक्षात ठेवलं पाहिजे, असेही रोहित पवार यांनी सांगितलं.
VSR कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा
रोहित पवार म्हणाले की, आम्ही या विषयात जितके खोलवर जात आहोत, तितके हेच समोर येत आहे की VSR कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे. यात सत्तेतील लोक, राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि यामागे जे पावरफुल लोक आहेत, ते या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. वैमानिकावर दबाव: मुख्य वैमानिकावर दबाव टाकून किंवा त्याला ब्लॅकमेल करून काही कृती करायला लावली असावी, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. अहमदाबादमधील क्रॅशच्या तपासातील काही अहवालांचा संदर्भही त्यांनी यासाठी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या
























