रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये अवघ्या 0.15 गुणांनी पदक हुकलेल्या, भारताची स्टार जिमनॅस्ट दीपा कर्माकरने देशवासियांची माफी मागितली आहे.

 

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात दीपानं कमालीची कामगिरी बजावून चौथ्या स्थान मिळवलं. पण तीचं कांस्यपदक थोडक्यात हुकल्याने दीपाने ट्विट करून सर्वांची माफी मागितली आहे.

 

रिओमध्ये सुरू असलेल्या 31व्या ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकर भारताचं प्रतिनिधित्व करत होती. चौथ्या स्थानावर राहूनही तिने इतिहास रचला आहे. पण तिच्या मनातली खंत तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

https://twitter.com/idipakarmakar/status/764904121199566848

 

"पदक न जिंकल्याबद्दल मी देशाच्या सव्वाशे कोटी जनतेची माफी मागत आहे, शक्य असल्यास मला माफ करा",  अशा शब्दात तिने रात्री उशिरा ट्विटरवरून माफी मागितली आहे.

https://twitter.com/idipakarmakar/status/764934223752855552