Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आणि पुलवामानंतरच्या सर्वात भयावह अतिरेकी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी वापरलेल्या शब्दांवरून देशामध्ये चर्चा सुरू आहे. 'धर्म पुछा, जाति नही' जातीने असे म्हणत देशात धर्मांध लोकांकडून काश्मीरी लोकांबद्दल द्वेष पसरवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून सुरक्षितपणे परतलेल्या लोकांकडून मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत. यामध्ये महाराष्ट्रामधून आलेल्या पर्यटकांनी सुद्धा बैसरन व्हॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नव्हती, जर सुरक्षा यंत्रणा असती, तर परिस्थिती वेगळी दिसली असती असाही त्यांच्या तोंडून सूर उमटला. त्यांनी रेस्क्यू केलं ती त्यांची जबाबदारी होती. तथापि, दोन-तीन चाॅपर आणखी सुद्धा तैनात करायला हवी होती अशी प्रतिक्रिया डोंबिवलीतील मृत्यूमुखी पडलेल्या अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी दिली. या हल्ल्यांमध्ये 26 जणांना आपला प्राण गमावा लागला. यामध्ये एका चिमुकल्या लेकराला सुद्धा आपल्या बापाचं छत्र कामयचं हरवल्याचं दु:ख असताना त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेनं मन सुन्न होऊन गेल्याशिवाय राहणार नाही. दहशतवाद्यांनी तब्बल सहा कुटुंबातील कर्त्या पुरुषांनाच टार्गेट करत त्या कुटुंबांना रस्त्यावर आणलं आहे. यामध्ये एका चिमुरड्याची सुद्धा प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याच्या उत्तराने यंत्रणा सुद्धा हादरून गेली असेल, असे त्याने शब्द वापरून एक प्रकारे मनातील आक्रोशाला वाचा फोडली.

'सरकार तो गई हुई है'

तो चिमुरडा मुलगा म्हणाला की सरकार तर गेल्यात जमा (सरकार तो गई हुई है) आहे. इतका मोठा दहशतवादी झाला आणि यांना काहीच माहिती नव्हतं. इकडे खाली (पहलगाममधील बैसरन व्हॅलीच्या खाली) पण पूर्ण आर्मी बेस होता. मात्र, त्यांना काहीच माहिती नव्हती. वरती (व्हॅलीमध्ये) आर्मी तैनात केली पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया त्याने माध्यमांशी बोलताना दिली. याच मुलाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या वडिलांना गमावलं आहे. सरकारकडून सुरक्षेत त्रुटी राहिल्या आहेत का? अशी विचारणा केली असता त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांना निरुत्तर करून सोडले. 

'गिधाडं संधी शोधत असतात'

दुसरीकडे, प्रत्यक्ष रक्तपात पाहिलेल्या अमरेंद्र कुमार सिंह यांनी सुद्धा पोस्ट लिहित धर्म पुछा, जाति नही असे म्हणणाऱ्या  लोकांपासून सावध राहण्याची वेळ असल्याचे म्हटलं आहे. स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे हजारो जणांचे बचाव कार्य शक्य झाल्याचे ते म्हणाले. हेच करत असताना त्यांनी दिल्ली ते श्रीनगर तिकीट अचानक 38 हजार झाल्याचे सांगत गिधाड संधी शोधत असतात, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक प्रकारे या व्यवस्थेवर सडकून प्रहार केला. हल्ला झालेल्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा युत्रणेचा कोणीच उपस्थित नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे. हाॅटेल, गाडी मालकांनी पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हरही रडत होता. जबरदस्तीने टीप दिल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या