हैदराबाद: देशात कोरोना विरोधातील लढा लसीच्या तुटवड्यामुळे कमजोर होताना दिसत आहे. कोविडच्या बर्‍याच हॉस्पिटलमध्ये बेड्स फुल्ल आहेत. ऑक्सिजनच्या अभावामुळे रूग्णालयात रुग्ण मरत आहेत. अशा परिस्थितीत दिलासादायक गोष्ट म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनशिवाय तिसरे शस्त्रही रशियाकडून आले आहे. शुक्रवारी रशियामध्ये बनविल्या जाणार्‍या स्पुटनिक-व्ही लसीचा पहिला डोस देण्यास सुरुवात झाली. पुढच्या आठवड्यापासून या लसीचा डोस सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाईल.


भारतात स्पुटनिक-V च्या 85 कोटीहून अधिक डोसची निर्मिती होणार
दरम्यान, रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी शुक्रवारी सांगितले की, “स्पुटनिक-व्ही रशिया-भारताची एक लस आहे. याचा मोठा भाग भारतात तयार होईल. आम्हाला आशा आहे की यावर्षी भारतात स्पुटनिक-व्हीच्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील. लवकरच स्पुटनिक-व्ही लाइट लस देखील लागू होईल अशी आशा आहे."


स्पुटनिक लस 995 मध्ये उपलब्ध असेल
डॉ. रेड्डी लॅब्ज म्हणाले, की “स्पुटनिक-व्हीचे सॉफ्ट लाउंच आज हैदराबादमध्ये सुरू झाला आहे. आम्ही लवकरच लसीच्या पुढील खेपेची अपेक्षा करतो. स्टॉकमध्ये वाढ झाल्यानंतर भारतात जूनच्या मध्यापासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होईल.” भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमत निश्चित केली गेली आहे. याची किंमत 948 रुपये असेल यावर पाच टक्के जीएसटी लागल्यानंतर त्याच्या एका डोसची किंमत 995 रुपये असेल.


फार्मास्युटिकल कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने शुक्रवारी सांगितले की, मर्यादित सुरुवात म्हणून हैदराबादमध्ये कोविड 19 प्रतिबंधक स्पुटनिक-व्हीची प्रथम लस दिली गेली. कंपनीने सांगितले की रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. कसौलीच्या सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून 13 मे 2021 रोजी ही लस मंजूर झाली होती. येत्या काही महिन्यांत या औषधाची दुसरी खेप भारतात पोहोचेल. त्यानंतर, भारतीय पुरवठादार भागीदारांकडूनही त्याचा पुरवठा सुरू होईल. स्थानिक उत्पादकांकडून पुरवठा सुरू झाल्यावर किंमत खाली येण्याची शक्यता आहे.