Bengaluru Stampede : RCB साठी चिअर अप करायला गेली अन् गर्दीत चिरडली, 14 वर्षांच्या मुलीचा चेंगराचेंगरीत मृत्यू
RCB Victory Parade : बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

बंगळुरू : तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएल जिंकणाऱ्या आरसीबी टीमच्या विजयोत्सवाला गालबोट लागलं आहे. बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर (Chinnaswamy Stadium Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिकजण यामध्ये जखमी झाले आहेत. मृतांमधील 10 जणांमध्ये एका 14 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बंगळुरु संघासाठी चिअर अप करण्यासाठी आलेल्या 10 जणांचा चेंगराचेंगरीत (Bengaluru Stampede) मृत्यू झाला. त्यामध्ये चार महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये नववीत शिकणाऱ्या 14 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. आपल्या आवडत्या टीमच्या विजयोत्सवात सामील होण्यासाठी ती मुलगी आई-वडिलांसह स्टेडिअमवर आली होती. नंतर त्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत ती चिरडली गेली आणि त्यामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Bengaluru Stampede : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चेंगराचेंगरी
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप केला जात आहे. 18 वर्षांनी ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचा विजयोत्सव मोठ्या प्रमाणावर होणार हे निश्चित होतं. अशाही परिस्थितीत प्रशासनाने काळजी घेतली नाही. प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन केलं नाही. स्टेडिअमवर मोफत प्रवेश असल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. नंतर ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी होऊन 10 जणांना जीव गमवावा लागला. मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
RCB Victory Parade Stampede : पोलिसांना दोष देणार नाही- डी के शिवकुमार
घडलेल्या घटनेवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "घडलेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही माफी मागतो.आमच्या पोलिसांना काही दोष देणार नाही. त्यांना शक्य ते त्यांनी केलं. पण गर्दीच इतकी होती की त्यावर नियंत्रण मिळू शकलं नाही. त्यामुळे ही दुर्घटना झाली."
Chinnaswamy Stadium Stampede : बंगळुरूत चेंगराचेंगरी का झाली ?
- आयपीएल विजेता आरसीबी संघ दुपारी बंगळुरुत दाखल झाला.
- एअरपोर्टवर खेळाडूंच्या स्वागताला चाहत्यांची प्रचंड गर्दी.
- चाहत्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली.
- चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याला चाहत्यांना फ्री एन्ट्री.
- चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 32 हजार इतकी आहे.
- मोफतच्या प्रवेशामुळे लाखो चाहते स्टेडियमबाहेर गोळा झाले.
- वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली.
- नियोजनातला आभाव, पोलिसांचा निष्काळजीपणा हा या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरला.
ही बातमी वाचा:





















