आरबीआय लवकरच 100 च्या नव्या नोटा चलनात आणणार
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2017 11:46 PM (IST)
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 100 च्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. तर सध्या चलनात असणाऱ्या 100 च्या नोटा देखील चालणार आहेत. आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. महात्मा गांधी सीरिज 2005 प्रमाणेच या नोटा असतील. मात्र नोटांच्या दोन्ही बाजुंनी इनसेट लेटर R लिहिलेलं असणार आहे. या नोटांवर प्रीटिंग वर्ष 2017 असणार असून सध्याचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल, असं आरबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान आरबीआयने यापूर्वीच 50, 100 आणि 20 च्या नव्या नोटा चलनात आणणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता 100 च्या नोटा येणार आहेत. मात्र यानंतरही जुन्या नोटा चलनात राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटांबदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जुन्या 500, 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात आल्या. त्यानंतर 500 च्या आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या.