जोधपूर: राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील मतोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतामालाएक्स्प्रेस वे वर भीषण दुर्घटना घडली. या भीषण अपघातात जोधपूरच्यासुरसागर येथील 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेत. भाविक बिकानेर येथील कोलायत मंदिराचं दर्शन घेऊन टेम्पोट्रॅव्हलरमधून परतले होते. हनुमान सागर भागात वेगवान टेम्पोट्रॅव्हलरनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या घटनेत 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Rajasthan Accident : राजस्थानात भाविकांच्या वाहनाचा अपघात, 15 जणांचा मृत्यू

फलोदीचे पोलीस अधीक्षक कुंदनकंवरिया यांनी या भीषण अपघातातील मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 3 जखमींनातातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून ग्रीन कॉरिडॉरकरुनजखमींनाजोधपूरला पाठवण्यात आलं. फलोदीचेडीएसपीअचलसिंहदेवडा यांनी म्हटलं अपघात इतका भीषण होता की टेम्पोट्रॅव्हलरचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

स्थानिकांना आणि पोलिसांनाटेम्पोट्रॅव्हलरमधीलमृतांचेमृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. ट्रॅव्हलरमधीलसीट आणि लोखंडात मृतदेह अडकले होते. फलोदीचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अमानाराम यांनी सर्व मृत्यू झालेले भाविक जोधपूरच्यासूरसागर क्षेत्रातील होते, असं सांगितलं. ते कोलायतचं दर्शन करुन परत येत होते.

जोधपूर पोलीस आयुक्त ओमप्रकाश माथूरघटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेतली. भारतमालाएक्स्प्रेसवेवरटेम्पोट्रॅव्हलर वेगात होती. दृश्यमानता कमी असल्यानं चालकाला रस्त्याच्या कडेला पार्क केलेला ट्रक दिसला नाही हे अपघाताचं प्रमुख कारण मानलं जात आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या रस्ते अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी फलोदीमतोडा भागात झालेला अपघात दु:खद आहे. या घटनेतील मृतांच्याकुटुंबाप्रती संवेदना असल्याचं भजनलाल शर्मा म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की मला पाटणा येथे फलोदीच्यामतोडा येथील रस्ते अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला परमेश्वरानं या संकटातून बाहेर पडण्याची हिंमत द्यावी, असं अशोक गहलोत म्हणाले.