Jodhpur Fire : राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये एका लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Explosion) झाल्याने गोंधळ उडाला. या अपघातात तब्बल 60 जण होरपळले असून 2 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शेरगडजवळील भुंगरा गावात गुरुवारी दुपारी 3.15 वाजता हा अपघात झाला. येथे एका घरी विवाह सोहळा होता. मिरवणूक घरातून निघणार होती, तेवढ्यात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
8 जण 90 टक्क्यांहून अधिक भाजले, दोन मुलांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. डॉ. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दिलीप कछावा यांनी सांगितले की, 60 जखमींपैकी 51 जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 8 जण 90 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. वॉर्डमध्ये 48 जण दाखल आहेत, 1 मुलगा आयसीयूमध्ये आहे. तर 5 आणि 7 वर्षांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला.
एकामागोमाग एक 5 स्फोट
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे मोठ्या संख्येने वराती उपस्थित होते. आगीत जखमी झालेल्या लोकांना शेरगड येथे आणण्यात आले. तर काही लोकांना जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस अधिकारी अनिल कायल यांनी सांगितले की, तब्बल 5 सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गळती होऊन ही आग लागली. आणि एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले. सिलिंडरचा स्फोट झाला तेव्हा जवळपास 100 लोक उपस्थित होते.
जोधपूरच्या रुग्णालयात गोंधळ
अपघाताची माहिती मिळताच जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालय व्यवस्थापन सतर्क झाले असून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एकामागून एक जखमी आल्याने रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सिलिंडरचा स्फोट महिलांच्या अंगावर
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभाच्या वेळी महिला हॉलमध्ये बसून बोलत होत्या. यावेळी सिलेंडरचा स्फोट झाला. जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच आरसीएचे अध्यक्ष वैभव गेहलोत, आमदार मनीषा पनवार, शेरगडच्या आमदार मीना कंवर हेही रुग्णालयात पोहोचले.
जखमी व्यक्तींची नावे
नवरा सुरेंद्र सिंग, त्याचे वडील शक्ती सिंग, आई दाकू कंवर, बहीण रसला कंवर, भाऊ संग सिंग, वहिनी पूनम कंवर, दोन पुतणे एपी आणि रतन हे भाजले.
यांच्यावर उपचार सुरू आहेत
डिंपल (13), कावेरी (19), कांचन कंवर (45), गवरी कंवर (40), रुक्मा कंवर (40), सुरेंद्र सिंग (30), साजन कंवर (56), रावल राम (18), मगरम (19) , जस्सा कंवर (36), सूरज कंवर (50), कनक कंवर (45), प्रकाश (16), सुरेंद्र सिंग (25), धापू कंवर (15), सज्जन कंवर (10), पप्पू कंवर (30), किरण ( महेश पाल (8), रसाल कंवर (29), तेज सिंग (50), दिलीप कुमार (24), सज्जन कंवर (35), सुगन कंवर (35), आंची कंवर (40), पूनम (25), दुर्ग सिंग (25). 26), संगत सिंग (50), उमेद (30), सुआ कंवर (60) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2 महिन्यांत दुसरी सिलेंडर स्फोटची घटना
जोधपूरमध्ये दोन महिन्यांतील ही दुसरी घटना समोर आली आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजी शहरातील कीर्तीनगरमध्ये गॅस रिफिलिंग दरम्यान अशीच घटना घडली होती. यामध्येही 15 हून अधिक जण दगावले असून 5 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांनंतर 8 डिसेंबरला जोधपूरच्या शेरगडमध्ये सिलेंडर स्फोटाच्या घटनेने पुन्हा हादरले.
मुख्यमंत्री-केंद्रीय मंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दोघांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अपघाताची संपूर्ण माहिती घेतली. उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना दिल्या.