Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्या (raja raghuvanshi case) प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी राजाची पत्नी सोनमसह (raja raghuvanshi case) पाच आरोपींना अटक केली आहे. परंतु हत्येचे ठिकाण आणि परिस्थिती अजूनही संशयास्पद आहे. आरोपींनी असा दावा केला होता की, त्यांनी राजाचा मृतदेह शिलाँगपासून 60 किमी अंतरावर असलेल्या सोहराच्या कुनोनग्रीम भागात 300 फूट खोल दरीत टाकला होता. शवविच्छेदन अहवालात शरीरावर कोणतेही फ्रॅक्चर आढळले नाहीत. यामुळे पोलिसांना संशय आला आहे की ही हत्या (raja raghuvanshi case) दुसरीकडे कुठेतरी झाली आहे आणि मृतदेह नंतर तिथे आणण्यात आला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे गूढ आधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. पोलीस प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास करत आहेत. या प्रकरणात अनेक नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींनी पोलिसांना सांगितले होते की, राजाला मारल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह शिलाँगपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या सोहराच्या कुनोनग्रीम भागात एका खोल दरीत टाकला होता. ही दरी सुमारे 300 फूट खोल आहे. परंतु शवविच्छेदन अहवालामुळे आरोपींच्या दाव्यांवर शंका निर्माण झाली आहे.
एक हाडही तुटलं नाही
शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की, राजाच्या शरीरातील एकही हाड मोडले नव्हते. सहसा इतक्या उंचीवरून पडल्यावर हाडे मोडतात. त्यामुळे, आता पोलीस तपास करत आहेत की, राजा रघुवंशीचा खून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी झाला होता का आणि नंतर मृतदेह कुनोन्ग्रीम येथे टाकण्यात आला होता का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
त्यांना या ठिकाणाची माहिती कशी मिळाली?
कुनोनग्रीमसारख्या निर्जन भागाची माहिती आरोपींना कशी मिळाली याबद्दलही तपासकर्त्यांना शंका आहे. हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारसे लोकप्रिय नाही. येथील दुकानेही अनेकदा बंद असतात. पोलिसांना संशय आहे की, एखाद्या स्थानिक व्यक्तीने आरोपींना मदत केली असावी. आरोपींनी या जागेची आधीच रेकी केली होती की नाही हे शोधण्यासाठी पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.
इंदूरची सोनम आणि राजा रघुवंशीची थरारक घटना
इंदूर शहरात नुकतंच विवाहबंधनात अडकलेल्या नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनच्या ट्रिपचा शेवट अत्यंत भयावह ठरला आहे. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह 11 मे रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर 20 मे रोजी हे दोघंही हनिमूनसाठी मेघालयातील शिलॉन्ग येथे गेले. मात्र 23 मेपासून दोघांचाही त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटला होता, ज्यामुळे अपहरणाची शक्यता व्यक्त केली जात होती. दोन आठवड्यांच्या शोधानंतर, 2 जून रोजी शिलॉन्गमधील एका दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सोनमच्या अपहरणाची चर्चा जोरात सुरू झाली. मात्र 9 जून रोजी सोनम स्वतःच पोलिसांसमोर हजर झाली आणि प्राथमिक चौकशीतच एक धक्कादायक सत्य उघड झालं. पोलिस तपासात समोर आलं की, राजाच्या हत्येचा कट सोनमनेच रचला होता. नेमका खून कशा कारणाने झाला, यामागे आर्थिक व व्यक्तिगत कारणं होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.