मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी खास व्यंगचित्र शेअर केलं आहे. यामध्ये त्यांनी मोदींचा ‘माझे असत्याचे प्रयोग’ असा उल्लेख केला आहे.
एकाच मातीतले दोघे, असं या व्यंगचित्राचं शीर्षक आहे. महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग केले, तर मोदी असत्याचे प्रयोग करत आहेत, असं राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगितलं आहे. सोशल मीडियावर हे व्यंगचित्र मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे.
दरम्यान यापूर्वीही दाऊद प्रकरणावरुन राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला होता. दाऊदला स्वतः भारतात यायचं आहे. मात्र तो भारतात आल्यानंतर त्याचं श्रेय भाजप सरकार घेईल, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
फेसबुक पेज लाँचिंगच्या कार्यक्रमातच राज ठाकरेंनी दाऊद प्रकरणावरुन मोदींना लक्ष्य केलं होतं. दाऊद सध्या आजारी असून तो भारतात यायला तयार आहे. कारण त्याला भारतात अखेरचा श्वास घ्यायचा आहे. पण तो स्वतःहून आल्यानंतर भाजप सरकार त्याचं श्रेय घेईल, असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरेंचा गांधी जयंतीनिमित्त व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2017 11:24 AM (IST)
एकाच मातीतले दोघे, असं या व्यंगचित्राचं शीर्षक आहे. महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग केले, तर मोदी असत्याचे प्रयोग करत आहेत, असं राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगितलं आहे.
फोटो : राज ठाकरे फेसबुक पेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -