नवी दिल्ली : जर तुम्ही रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवास करत असाल, तर तुम्हाला अनेक सहप्रवासी ट्रेनमध्ये लवकर झोपताना दिसतील. यातील काही प्रवाशांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. पण रेल्वेकडून नुकतीच एक नवी नियमावली जारी करण्यात आली असून, यात रेल्वे प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान झोपण्याची निश्चित वेळ बदलून त्यात एक तासांची कपात करण्यात आली आहे. यातून रेल्वेने मिडल बर्थवरील प्रवाशांच्या कटकटीवर नवा उपाय शोधून काढला आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान, अनेकदा लोअर बर्थ किंवा अप्पर बर्थवरील प्रवाशांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. त्यामुळे या दोन्ही बर्थवरील प्रवासी गप्पा मारत, किंवा मनोरंजनाच्या इतर वस्तूंचा वापर करुन प्रवास मजेत करत असतात. पण त्यामुळे मिडल बर्थच्या प्रवाशांना सवयीप्रमाणे लवकर झोपायची इच्छा असूनही, झोपायाला मिळत नाही. त्यामुळे ते अनेकदा याबाबत तक्रार करत असतात. किंवा काही ठिकाणी हुज्जत घालण्याचे प्रकारही होतात.
रेल्वे प्रवाशांसाठीच्या आधीच्या नियमाप्रमाणे रात्री 9 ते 6 पर्यंत झोपण्याची वेळ निश्चित होती. त्यामुळे रात्री 9 पर्यंतच अप्पर आणि लोअर बर्थवरील रेल्वे प्रवासी आपल्या सीटवर बसून प्रवास करु शकत होते. यानंतर दोन्ही बर्थवरील प्रवाशांना आपली बर्थ मोकळी करुन, मिडल बर्थवरील प्रवाशांना बर्थ सिट उपलब्ध करुन द्यावी लागत होती.
पण आता नव्या नियमानुसार, यात अजून एक तासाची कपात करण्यात आली आहे. रेल्वेने आता रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झोपण्याची वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे पुन्हा मिडल बर्थवरील रेल्वे प्रवाशांना रात्री 10 शिवाय आपल्या बर्थसाठी दावा करण्यात येणार नाही.
रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी याबाबत सांगितलं की, प्रवाशांच्या तक्रारींवरुन आम्ही यावर गांभीर्यानं विचार करत होतो. त्यानुसार, आता प्रवासादरम्यान रात्री झोपण्याची वेळ रात्री 9 वरुन 10 करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या निर्णयामुळे इतर प्रवाशांना सीटवर बसण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होतील.
विशेष म्हणेज, हा निर्णय साईड अप्पर सीटवरील प्रवाशांसाठी लागू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र, यातून दिव्यांग आणि अजारी व्यक्ती, तसेच गर्भवती महिलांना सूट देण्यात आली आहे.
1 सप्टेंबरपासून जनशताब्दी आणि इतर सिटिंग चेअर कार एक्स्प्रेस सोडल्यास, इतर एसी फर्स्ट क्लास, एसी टू टियर व थ्री टियर कोचसाठी हे नियम लागू असतील.
रेल्वेकडून मिडल बर्थच्या कटकटीवर उपाय, रात्री 10 शिवाय झोपण्यास मनाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2017 09:49 AM (IST)
रेल्वेकडून नुकतीच एक नवी नियमावली जारी करण्यात आली असून, यात रेल्वे प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान झोपण्याची निश्चित वेळ बदलून त्यात एक तासांची कपात करण्यात आली आहे. यातून रेल्वेने मिडल बर्थवरील प्रवाशांच्या कटकटीवर नवा उपाय शोधून काढला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -