पुणे : सहलीचा आनंद लुटण्यासाठी हसत-खेळत घराबाहेर पडलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. रायगड श्रीवर्धन जिल्ह्यातील तालुक्यातील दिवेआगर (Raigad Diveagar beach death) समुद्रकिनारी काल (गुरुवारी, ता १) सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेत विनर्स अकॅडमीच्या अकरावी-बारावी विज्ञान शाखेतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. अवघ्या १६ ते १७ वर्षांच्या या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची (Raigad Diveagar beach death) बातमी आळंदीत पोहोचताच शहरा खळबळ उडाली. तर याबाबत प्रत्यक्षदर्शीने माहिती देताना सांगितलं की, त्याने दोन विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण मोठ्या लाटेमध्ये ते पुढे गेले.(Raigad Diveagar beach death)
Raigad Diveagar beach Tragedy: काय झालं नेमकं काल त्या ठिकाणी?
प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने सांगितलं की, मी प्रयत्न केला दोन जणांना वाचवायचा. पण मोठी लाट आली आणि नेमकं ते याचं टायमिंग होतं लाटेचं, मग ते दोन पोरांना घेऊन गेली लाट. त्यामुळे मला वाचवताच नाही आलं. मी प्रयत्न केले पण दोन जण ते गेले... माझ्यासोबतच होते ते. आम्ही पाण्यामध्ये खेळत होतो. मुली बाहेर खेळत होत्या. शिक्षक पण होते, पण शिक्षक बाहेर चालले होते तेव्हा शिक्षक बाहेर जात असताना हे असं सगळं मागे घडलं. ही घटना आयुष्यभर लक्षात राहणारी आहे, असंही त्या प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांने सांगितलं आहे.(Raigad Diveagar beach death)
Raigad Diveagar beach Tragedy: नेमकं काय घडलं?
विनर्स अकॅडमीतील ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगरच्या सहलीसाठी काल (गुरुवारी, ता २) पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. या गटात २५ मुले, १७ मुली व सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी समुद्रात उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यातून ८ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे, प्रणव बनसोडे अशी असून, सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. हे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. समुद्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेले.
