मुंबई : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी हेच भारताचे पुढचे पंतप्रधान असतील, असं भाकित भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांनी वर्तवले आहे. त्याचसोबत, सुधींद्र कुलकर्णी यांनी राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे.
सुधींद्र कुळकर्णी नेमके काय म्हणाले?
"एका नव्या नेत्याचा जन्म झाला आहे, ज्याची भारताला गरज आहे. एक असा नेता, जो खऱ्या अर्थाने गांधीवादी तत्त्वज्ञान मानणारा आहे. प्रेम, सेवा, सर्वसमावेशकता आणि सुसंवाद असे गुण असणारा नेता आहे. आज मला अधिक खात्री पटलीय की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भारताचे पुढचे पंतप्रधान व्हावेत आणि ते होतील.", असे सुधींद्र कुलकर्णी म्हणाले.
https://twitter.com/SudheenKulkarni/status/941947178712367104
सुधींद्र कुलकर्णी कोण आहेत?
मूळचे पत्रकार असणारे सुधींद्र कुलकर्णी जवळपास 13 वर्षे भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी 2009 साली पक्षाला राम राम केला. अटल बिहारी वाजपेयी हे भारताच्या पंतप्रधानपदी असताना सुधींद्र कुलकर्णी हे पंतप्रधान कार्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत होते.
सुधींद्र कुळकर्णी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय मानले जातात. अडवाणींची भाषणं लिहिण्याची जबाबदारीही सुधींद्र कुलकर्णींवर होती.
2008 साली 'कॅश फॉर व्होट' प्रकरणात सुधींद्र कुलकर्णी यांनी तुरुंगवासही भोगला आहे. 2015 मध्ये शिवसेनेने कुळकर्णींना पाकिस्तानी एजंट म्हणत त्यांच्यावर शाईफेक केली होती.
दरम्यान, कधीकाळी भाजपशी संबंधित आणि लालकृष्ण अडवाणींचे निकटवर्तीय असणाऱ्या सुधींद्र कुलकर्णींनी राहुल गांधींचं तोंडभरुन कौतुक करत, पंतप्रधान होण्याची आशा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
पुढचे पंतप्रधान राहुल गांधीच असतील : सुधींद्र कुलकर्णी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2017 01:32 PM (IST)
सुधींद्र कुलकर्णी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय मानले जातात. अडवाणींची भाषणं लिहिण्याची जबाबदारीही सुधींद्र कुळकर्णींवर होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -