Rahul Gandhi : काय करायचं असेल ते करा, शेतकऱ्यांसोबत उभा राहणार, एक इंच मागं हटणार नाही : राहुल गांधी
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करुन देशातल्या शेतकऱ्यांसोबत उभं राहणार असल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सलग दुसऱ्या दिवशी हल्लाबोल केला आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी यांनी आक्रमकपणे शेतकरी देशाचा पाया असल्याचं म्हटलं होतं. आज राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओतून माझ्यावर एफआयआर असो, गुन्हा दाखल होऊद्यात किंवा हक्कभंग प्रस्ताव आणूद्यात मी शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.
Rahul Gandhi: राहुल गांधी काय म्हणाले?
जो व्यापार करार शेतकऱ्यांची रोजी रोटी हिसकावून घेईल, देशाच्या अन्न सुरक्षेला कमजोर करेल ती शेतकरी विरोधी असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अन्नदात्याच्या हिताबाबत शेतकरी विरोधी मोदी सरकारला समझोता करुन देणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
नमस्कार, मी काल म्हटलं की शेतकरी हा भारताचा पाया आहे, अन्न सुरक्षेसाठी काँग्रेस आणि भारतानं लढा दिला. नरेंद्र मोदी यांनी अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांना धोका दिला आहे. अमेरिकेसोबत करार करुन कापूस, सोयाबीन, सफरचंद आणि फळ उत्पादक शेतक्रायंना विकलं आहे. भारताच्या कृषी बाजारावर वर्षांपासून विदेशातील लोक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी दरवाजा उघडला आहे. हे सत्य आहे, हे ते देखील जाणतात आणि मी देखील जाणतो, असं राहुल गांधी म्हणाले. दरवाजा का उघडला आहे तर त्यांच्या गळ्याला चोक लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांची लगाम पकडली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
मका, कापूस सोयाबीन आणि फळं ही सुरुवात आहे. नरेंद्र मोदी पूर्ण कृषी मार्केटचे दरवाजे आपल्या मित्रांसाठी, विदेशी शक्तींसाठी उघडतील. भारताचे शेतकरी आणि संपूर्ण देशाला माहिती आहे, नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
पहिल्यांदा त्यांनी काळे कायदे आणले होते, आता त्यांनी विदेशी शक्तींसाठी दरवाजे उघडले आहेत. अमेरिकेमधील शेतकऱ्यांची शेती मोठी असते, हजारो एकरची शेती असते, यांत्रिकीकरण झालेलं आहे. सरकार त्यांना अनुदान देतं आहे. आपल्या शेतकऱ्यांची शेतं लहान आहेत. योग्य एमएसपी मिळत नाहीत, यांत्रिकीकरणाचं नाव नाही. नरेंद्र मोदीजींनी देशाला विकलंय, शेतकऱ्यांना विकलंय असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
तुम्ही माझ्यावर केस करा, शिवी द्या जे करायचं आहे ते करा, विशेषाधिकार भंग आणायचा असल्यास आला, काही फरक पडत नाही. संसद भवनात सत्य बोललो आहे.तुम्हाला सत्य चांगलं वाटत नसेल तर दुसरी गोष्ट आहे. देश सत्य समजतो, तुम्हाला काही करायचं असेल ते करा मी शेतकऱ्यांसोबत उभा आहे. एक इंच मागं हटणार नाही. काँग्रेस अध्यक्ष खर्गेजी, काँग्रेस पार्टी आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत आहोत. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
FIR हो,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 12, 2026
मुकदमा दर्ज हो या
Privilege प्रस्ताव लाएं - मैं किसानों के लिए लड़ूंगा।
जो भी ट्रेड डील किसानों की रोज़ी-रोटी छीने या देश की खाद्य सुरक्षा को कमजोर करे, वह किसान-विरोधी है।
अन्नदाताओं के हितों से किसान-विरोधी मोदी सरकार को समझौता नहीं करने देंगे। pic.twitter.com/gNVMEYFp3i

























