Rahul Gandhi :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) दिलासा देत त्यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी त्यांची खासदारकी देखील परत मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या या निर्णयावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanaka Gandhi) यांनी देखील ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सर्वोच्च न्यायालायाचे आभार मानले आहेत. मोदी आडनावावरुन मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांनी सुरत कोर्टाने शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालायने सुरत कोर्टाचा हा निर्णय कायम ठेवला होता. पण आता सर्वोच्च न्यायालायने गुजरात उच्च न्यायालायाच्या या निर्णयावर स्थगिती दिली आहे. 


प्रियांका गांधी यांचं ट्वीट काय?


प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे, तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य. सर्वोच्च न्यायालायने न्याय्य निर्णय दिल्याबद्दल त्यांचे आभार. सत्यमेव जयते. 






निर्णयाचं मनापासून स्वागत : सुप्रिया सुळे 


राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अजूनतरी या देशामध्ये लोकशाही शिल्लक आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या बाजून जो निर्णय दिला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते. तर राहुल गांधी अशी काय मोठी चूक केली होती जी त्यांना अशी शिक्षा सुनावण्यात आली असा सवाल देखील त्यांनी माझाच्या माध्यमातून विचारला आहे. 


हा सत्य आणि न्यायाचा विजय : अशोक गेहलोत


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटंल की, हा सत्य आणि न्यायाचा विजय आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या संदर्भात जो निर्णय दिला आहे तो स्वागतार्ह असल्याचं देखील अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. 


मोदी आडनावाच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावत त्यांची खासदारकी रद्द केली होती. त्यानंतर काँग्रेसकडून या निर्णयाचा कडाडून विरोध करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील सुरत कोर्टाच्या आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rahul Gandhi: राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार... मानहानीप्रकरणी शिक्षेला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा