Rahul Gandhi Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेत भाषण केले. मोदी यांनी चीन आणि ट्रम्प यांच्या दाव्यांवर थेट नाव न घेता प्रतिक्रिया दिली नाही. विरोधकांनी मोदींच्या भाषणावर सडकून प्रहार केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात चीनचे नाव न घेतल्याबद्दल आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांचे थेट खंडन न केल्याबद्दल सडकून केली. राहुल गांधी यांनी मोदींच्या भाषणपूर्वी म्हणाले होते, इंदिरा गांधींच्या 50 टक्के मोदींमध्ये दम असेल, तर संसदेतील भाषणात मोदींनी ट्रम्प खोटारडे आहेत, खोटं बोलत आहेत हे मोदींनी आजच्या भाषणात सांगावं. मात्र, मोदी यांनी चीनचा उल्लेख केलाच नाही. तसेच जगातील कोणत्याच नेत्याने फोन केला नाही म्हणत ट्रम्प यांचे नाव घेण्याचे टाळले. 

सरकार चीनच्या भूमिकेबद्दल बोलण्याचे टाळत आहे

संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "सरकार अलिकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षात चीनच्या भूमिकेबद्दल बोलण्याचे टाळत आहे. त्यांनी कधीही स्पष्टपणे म्हटले नाही की ट्रम्प खोटे बोलत आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात एकदाही चीनचा उल्लेख केला नाही. संपूर्ण देशाला माहित आहे की चीनने पाकिस्तानला सर्व प्रकारे मदत केली, परंतु पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कुठेही चीनचे नाव घेतले नाही." 

भाजपला शब्दात पराभूत करू शकत नाही

समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणाले, "कोणीही भाजपला शब्दात पराभूत करू शकत नाही. जर भाजपला पाकिस्तानच्या समर्थनात कोणताही धोका दिसत नसेल तर त्यांना कोण दाखवू शकेल? असा देश जो आपली बाजारपेठ हिसकावून घेत आहे, आपल्या सीमांवर अतिक्रमण करत आहे. भाजपने किमान 2014 पासून आजपर्यंत भारताचे क्षेत्र वाढले आहे की कमी झाले आहे हे तरी सांगावे. आपल्या सर्वांना आपल्या सीमा शांत आणि सुरक्षित हव्या आहेत, परंतु त्यांना सर्वात मोठा धोका असलेल्या देशाची काळजी नाही. आपण स्वावलंबनाबद्दल बोलतो, देश स्वावलंबी असावा, उत्पादन क्षेत्राचा विस्तार झाला पाहिजे, परंतु आपण एक व्यापारी देश बनलो आहोत.

" ते पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशात 'ठोक दो' धोरण लागू होते. हे लोकसभेचे धोरण नाही. यावरून मी काय समजून घ्यावे? उत्तर प्रदेशात जे काही घडले, तेच आता घडेल. जर दहशतवादी मारले गेले असतील, तर पुन्हा एकदा गुप्तचर यंत्रणेत बिघाड झाला आहे. सरकार आपल्याला सांगेल का की दहशतवादी वारंवार भारतात कसे येत आहेत? याचे उत्तर कोण देईल? याची जबाबदारी कोण घेईल? राफेल विमान उडाले की नाही?" 'प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.' संभळ येथील समाजवादी पक्षाचे खासदार झिया-उर-रहमान बर्क म्हणाले, "आम्ही काही प्रश्न विचारले होते आणि आशा होती की केवळ सभागृहालाच नाही तर संपूर्ण देशाला त्यांची उत्तरे मिळतील, परंतु तसे झाले नाही. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली, परंतु आम्हाला उत्तरे मिळाली नाहीत."

'काहीही नवीन नव्हते...'

मोदींच्या भाषणावर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, "काहीही नवीन नव्हते. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाहीत. आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे आणि आम्ही आमच्या पंतप्रधानांसोबत आहोत, आम्ही हे आधीच सांगितले आहे. आम्हाला फक्त दोन प्रश्नांची उत्तरे हवी आहेत - 26 लोक का मारले गेले? ही सरकारची अक्षमता आहे. जेव्हा अध्यक्ष ट्रम्प श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांनी (मोदी) त्यांना दोष का दिला नाही?" 'लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहे.'

मोदी अजूनही भूतकाळाबद्दल बोलत आहेत

काँग्रेसचे खासदार किरण कुमार म्हणाले, "सध्याच्या राजवटीच्या 11 वर्षांनंतरही पंतप्रधान मोदी अजूनही भूतकाळाबद्दल बोलत आहेत. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ते तथ्यांबद्दल बोलत नाहीत. आम्ही काय मागणी करत आहोत आणि आज आम्ही हे 16 तासांचे विशेष अधिवेशन का बोलावले आहे हे ते देशाला स्पष्ट करत नाहीत. त्यांनी अंतर्गत सुरक्षेतील अपयशाचा उल्लेख केला नाही, ट्रम्पने हस्तक्षेप केला की नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले नाही. ते देशातील लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत." काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले, "ट्रम्प यांचा दावा खोटा आहे की नाही, ते खरे बोलत आहेत की नाही हे आम्ही स्पष्टपणे विचारत आहोत. याचे उत्तर नाही. ते (मोदी) ट्रम्पबद्दल बोलण्यास का घाबरतात? जेव्हा विरोधकांकडून खरे प्रश्न विचारले जातात तेव्हा ते पाकिस्तानच्या कथेमागे लपतात. लोकांना हे माहित आहे. आम्ही पाकिस्तानविरुद्ध लढणारे लोक आहोत, आम्ही भारतासाठी आहोत."

इतर महत्वाच्या बातम्या