एक्स्प्लोर

राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी, धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे.

Rahul Gandhi :  लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या राज सिंह अमेराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या धमकीची राजस्थानमधील कोटा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. कोटा शहराच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरु आहे. कायदा सर्वोच्च आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, 

आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही - करणी सेना

व्हिडिओमध्ये राज सिंह अमेरा यांनी स्वतःला करणी सेनेचे कोटा विभागीय प्रभारी म्हणून ओळखले. दरम्यान, करणी सेनेने म्हटले आहे की त्यांचा याशी कोणताही संबंध नाही. ज्या अकाउंटवरून धमकी देण्यात आली होती ते अकाउंट निष्क्रिय करण्यात आले आहे. अमेरा हा कोटाचा रहिवासी आहे. त्याने ही धमकी इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघड धमक्या दिल्या जात आहेत. ही तीच विषारी आरएसएस मानसिकता आहे ज्याने एकेकाळी नथुराम गोडसेला जन्म दिला होता. हे भाजप-आरएसएसच्या उघड वैचारिक अतिरेकीपणाचे एक मॉडेल आहे, जिथे मतभेद आणि विरोधकांना राष्ट्रविरोधी असे लेबल लावून प्रथम वातावरण तयार केले जाते आणि शेवटी हिंसाचारासाठी जागा तयार केली जाते.

हा देश गोडसेच्या विचारसरणीचा नाही तर गांधींच्या मार्गावर चालणारा

राजस्थान काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांदी हे संवैधानिक पदावर आहेत. ते लाखो भारतीयांच्या हक्कांचा आणि न्यायाचा आवाज असल्याचे गोविंद सिंह म्हणाले. परंतु ज्या अतिरेकी संघटनांनी त्यांना हत्येची धमकी दिली आणि कट रचला ते नेते आणि कार्यकर्ते मोकाट फिरत आहेत हे आश्चर्यकारक असल्याचा आरोप गोविंद सिंह यांनी केला आहे. अशा लोकांवर कारवाई कधी होणार? भाजप-आरएसएसने कितीही विष पसरवले तरी हा देश गोडसेच्या विचारसरणीचा नाही तर गांधींच्या मार्गावर जाईल असे गोविंद सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Rahul Gandhi : काय करायचं असेल ते करा, शेतकऱ्यांसोबत उभा राहणार, एक इंच मागं हटणार नाही : राहुल गांधी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Sonam Wangchuk Detention Revoked: सोनम वांगचुक यांच्यावरील एनएसए केंद्र सरकारकडून रद्द; 170 दिवसांनंतर जोधपूर जेलमधून तत्काळ सुटका होणार
सोनम वांगचुक यांच्यावरील एनएसए केंद्र सरकारकडून रद्द; 170 दिवसांनंतर जोधपूर जेलमधून तत्काळ सुटका होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget