नवी दिल्लीलोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चासत्रात सहभाग घेतला. पहलगाममध्ये भारतीयांवर निर्दयीपणे पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला, असं राहुल गांधी म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरच्यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष जनतेनं निवडून दिलेल्या सरकारसोबत उभे राहिलो, असं राहुल गांधी म्हणाले.  इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते आणि संपूर्ण विरोधी पक्ष एकत्रितपणे सरकारसोबत राहिलो, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी त्यांचे नातेवाईक गमावले त्यांना भेटल्यानंतर जे अनुभव आले ते लोकसभेत मांडले. संरक्षण दलांना मोकळी सूट द्यावी लागेल. राजकीय इच्छाशक्ती आणि ऑपरेशन राबवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात 1971 आणि ऑपरेशन सिंदूरची तुलना केली. 1971 मध्ये राजकीय इच्छाशक्ती होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जगाची महासत्ता येत असताना पर्वा करत नसल्याचं सांगितलं होतं. आमचं काम पूर्ण करु असं सांगितलं होतं. त्यावेळी माणेकशॉ यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं, त्यामुळं एक देश निर्माण झाला, असं राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यात दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतात हे लोकसभेत सांगावं, असं आव्हान राहुल गांधी यांनी दिलं. 

राजनाथ सिंह यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर 1.05 ला सुरु झालं. ऑपरेशन सिंदूर 22 मिनिटात संपलं. त्यानंतर 1.35 ला पाकिस्तानला कॉल करुन सांगितलं की आम्ही लष्करी तळांना टार्गेट केलेलं नाही. आम्हाला संघर्ष नकोय असं त्यांनी पाकिस्तानला सांगितलं. डीजीएमओला भारताच्या सरकारनं 1.35 ला शस्त्रसंधीबाबत सांगण्यात आलं, असं राहुल गांधी म्हणाले. यातून लढण्याची राजकीय इच्छाशक्ती तुमच्यात नसल्याचं तुम्ही सांगितल्याचं राहुल गांधी राजनाथ सिंह यांच्या भाषणावरुन म्हणाले. सीडीएस अनिल चौहान यांनी जेट का पडली हा महत्त्वाचा प्रश्न आहे, काय चुका झाला, टॅक्टिकल चुका झाल्या याचा शोध घेत असल्याचं म्हणाल्याचं राहुल गांधी म्हणाले. अनिल चौहान यांची चूक झाली नाही, एअर फोर्सची चूक झाली नाही चूक राजकीय इच्छा शक्तीची झाली. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात विदेशी मंत्री एस. जयशंकर यांच्यावर देखील हल्लाबोल केला. जगातील सगळ्या देशांनी दहशतवादाचा निषेध केला. मात्र कोणत्याही देशानं पाकिस्तानचा निषेध केला नाही, असं राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल 

 राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं की पंतप्रधानांनी समजून घ्यावं की देश तुमची इमेज, राजकारण आणि पीआरच्या वर आहे. सैन्यदल तुमच्या पीआरच्या वर आहेत. तुमच्याकडे ते समजून घेण्याची विनम्रता असली पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.