Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Rahul Gandhi Form 6 Controversy : फॉर्म-6 मधील बदलांबाबत राहुल गांधी यांनी केलेले दावे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने फॅक्ट चेक जारी केले आहे.

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोग (Election Commission) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'फॉर्म-6' (Form 6) मधील बदलांवरून सुरू असलेला राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले असून, त्यांचे वक्तव्य पूर्णपणे 'दिशाभूल करणारे' असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म-6 मध्ये बेकायदेशीर आणि एकतर्फी बदल केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपांवर आता निवडणूक आयोगाने अधिकृत फॅक्ट चेक (Fact Check) जारी करत राहुल गांधींचे दावे खोडून काढले आहेत.
Rahul Gandhi Allegations : 'भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी पदाचा गैरवापर'
निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबरच्या प्रेस नोटचा हवाला देत राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर एक पोस्ट शेअर केली होती. "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म-6 मध्ये अवैध आणि एकतर्फी बदल केले आहेत. भारतीय जनता पक्षाला (BJP) राजकीय फायदा पोहोचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पदाचा हा थेट गैरवापर आहे," असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
लोकशाहीवरील या 'गुन्हेगारी हल्ल्यात' सहभागी असलेल्या ज्ञानेश कुमार आणि इतर सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना कायदेशीर उत्तरदायी ठरवले जाईल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला होता.
It is now established beyond doubt that Gyanesh Kumar changed Form 6 illegally and unilaterally. This is just one more proof of him abusing his position to help the BJP. He and everyone else involved in this criminal assault on our democracy will be held accountable. https://t.co/a33eJdPetu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 5, 2026
Election Commission Fact Check : निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले
राहुल गांधींच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाने तात्काळ 'फॅक्ट चेक' जारी करत प्रत्युत्तर दिले आहे. बिहारमधील एसआयआर (SIR) संदर्भातील आदेश 24 जून 2025 रोजी निवडणूक आयोगाच्या सर्वसंमत मंजुरीनेच जारी करण्यात आला होता, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
तसेच, निवडणूक आयोगाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देखील 27 मे 2026 रोजी दिलेल्या आपल्या ऐतिहासिक निर्णयात वैध ठरवत कायम ठेवले होते, अशी माहिती निवडणूक आयोगाने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
Fact Check ❌The statement made in this post is misleading ✅1) The order for SIR in Bihar issued on 24 June 2025 was issued with the unanimous approval of the Commission. This order has been upheld by the Hon'ble Supreme Court of India in its judgment dated 27 May 2026 ✅2) In its Press Note No. 120 dated 26 September 2026, in Point 1(iii), ECI has stated that, "The declaration attached to Form 6 for SIR has been upheld by the Hon'ble Supreme Court." #ECIFactCheck
— Election Commission of India (@ECISVEEP) October 5, 2026
Supreme Court Statement : सरन्यायाधीश सूर्यकांत यांची महत्त्वाची टिप्पणी
दुसरीकडे, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एक अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. "एसआयआर दरम्यान मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म 6 च्या कोणत्याही सुधारित आवृत्तीला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही," असे सरन्यायाधीशांनी सोमवारी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकीवर सुनावणी करताना न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे या मुद्द्यावरून आता काँग्रेस, निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:






















