Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करताच आंतरराष्ट्रीय वर्तुळाची नजर आता भारत आणि पाकिस्तान या दोन प्रदेशांवर खिळली आहेत. आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना लष्करी संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला जात आहे . (IND VS PAK) दोन्हीही देशांनी युद्धाचा विचारही करू नये असे सुचवले जात आहे . इराण, अमेरिका, जपान, चीन अशा अनेक देशांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता कतारने ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर प्रतिक्रिया दिली आहे .दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे . (Qatar)
कतार हा देश त्याच्या राजनैतिक संतुलनासाठी जागतिक मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी ओळखला जातो . इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष असो किंवा अफगाण्यात तालिबान आणि अमेरिकेतील चर्चा असो कतारने अनेक वेळा मध्यस्थी म्हणून भूमिका बजावली आहे .भारत आणि पाकिस्तानशीही चांगले संबंध असणाऱ्या या देशाची ऑपरेशन सिंदूरवरील प्रतिक्रिया यामुळे महत्त्वाची मानली जात आहे .
कतारची भूमिका काय ?
कतारचा परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरवर म्हटले आहे " आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे, विवेकाचा आवाज ऐकण्याचे आणि राजनैतिक मार्गाने समस्या सोडविण्याचे आवाहन करतो .प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी हे आवश्यक आहे .या विधानावरून हे स्पष्ट होते की कतार संघर्ष ऐवजी सलोखा आणि संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे .हे केवळ एक राजनैतिक विधान नाही तर भारत आणि पाकिस्तान सारख्या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील संभाव्ययुद्धाची भीती टाळण्याचा देखील प्रयत्न आहे . " याबाबत कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले .ज्यामध्ये दोन्ही देशांना संयम आणि राजनैतिक तोडगा काढण्यासाठी तातडीने संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय . दोन्ही देशांना यात कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी कतार पूर्ण सहकार्य करेल असेही यात म्हटलंय .
कतार आणि युएइ हे आखाती देश भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी तेल वायू आणि व्यापाराचा महत्त्वाचा स्रोत आहे .भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देशांमधील परिस्थिती नियंत्रण बाहेर गेली तर केवळ या दोन्ही देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात .
हेही वाचा:
