Blast at Police's Intelligence Headquarter : मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीत स्फोट झाला आहे. इमारतीच्या दुसऱ्या रॉकेटसारखी वस्तू पडल्याची शक्यता आहे. स्फोटामुळे बिल्डींगमधील काचा तुटल्या असून रॉकेटसदृश्य वस्तू पडल्यानंतर स्फोट झाल्याची माहिती  मिळली आहे.


या स्फोटामुळे इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. प्राथमिक माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास रॉकेट सदृश वस्तू इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आदळली आहे. ही वस्तू दुसऱ्या मजल्यावर आदळल्याने दुसऱ्या मजल्यावर मोठा स्फोट झाला आहे. इमारतीच्या काही काचा तुटल्या आहेत.या घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. पोलीस याचा कसून तपास सुरू आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार या हल्ल्यात मोठे नुकसान झालेले नाही. हा हल्ला  कसा झाला याचा तपास पोलीस करत आहे. मात्र कोणतीही जीवितहानी हल्ल्यात झालेली नाही. पोलिसांनी संपू्र्ण परिसर सील केलेला आहे. फॉरेन्सिकची टीम देखील घटनास्थळी झाली आहे. 


मोहाली हे चंदीगढला लागून असलेले शहर आहे. राजधानीलगत असलेल्या शहरामध्ये हा स्फोट झाला आहे.  ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला ती इमारत पोलिसांची आहे. पोलिसांच्या इमारतीवर हल्ल्यामागे नेमके कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.