Not Specified
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2019 08:58 AM (IST)
फोटो : शहीद संजय राजपूत, बुलडाणा
बुलडाणा : जम्मू काश्मिरमधल्या पुलवामात सीआरपीएफ जवानांवर काल सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 37 जवान शहीद झाले असून यामध्ये बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांचा समावेश आहे. मूळ मलकापूरचे असलेले संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले. सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 37 जवान शहीद झाले असून पाच जवान जखमी आहेत. दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवला. आदिल गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.