लखनौ : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी आजपासून गंगा यात्रेला सुरुवात करणार आहेत. आज त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये दाखल होतील. प्रियंका गांधी प्रयागराज (अलाहबाद) ते वाराणसीदरम्यान तब्बल 140 किमीचा प्रवास बोटने करणार आहेत.
प्रियंका गांधी यांच्या या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्याला 'गंगा जमुना तहजीब यात्रा' असं नाव देण्यात आले आहे. यादरम्यान त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाला उत्तर म्हणून 'सांची बात' कार्यक्रम करणार आहेत.
या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान प्रियंका गांधी वेगवेगळ्या भागात जाऊन कार्यकर्त्यांना आणि विविध घटकातील लोकांना भेटणार आहेत. मंगळवारी 19 मार्च रोजी प्रियंका गांधी यांच्या स्वागतानिमीत्त वाराणसीच्या असी घाटावर कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्या काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. रविवारी लखनौवरून प्रयागराजला पोहोचत त्यांनी स्वराज भवनला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या आजी इंदिरा गांधी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाने पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. तेंव्हापासून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना सुरवात केली आहे. आता त्या नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत गंगा स्वच्छताची घोषणा देत वाराणसी मतदारसंघातून विजय मिळवला होता. तसेच याही वेळेस मोदी वाराणसीमधून लढण्याची शक्यता
प्रियंका गांधी आज नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात, मन की बातला उत्तर म्हणून सांची बात करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Mar 2019 11:28 AM (IST)
प्रियंका गांधी यांच्या या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्याला 'गंगा जमुना तहजीब यात्रा' असं नाव देण्यात आले आहे. यादरम्यान त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाला उत्तर म्हणून 'सांची बात' कार्यक्रम करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -