नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी वाड्रा यांना डेंग्यू झाला आहे. प्रियांका यांच्यावर दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ डीएस राणा यांच्या माहितीनुसार, प्रियांका वाड्रा यांना 23 ऑगस्टपासून ताप होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्रियांका गांधींना डेंग्यू झाल्याचं निदान शुक्रवारी झालं. डॉक्टरांसह कुटुंबीयांना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
https://twitter.com/ANI/status/901002992446431233
डॉक्टर अरुप बसू यांच्या देखरेखीखाली प्रियांका यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, दिल्लीत आतापर्यंत डेंग्यू 657 रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये दिल्लीचे 325 आणि इतर राज्यांतून आलेल्या 332 रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.