Priyanka Gandhi on BJP: भाजपला महिलांचे मसीहा बनायचे आहे, पण महिलांनी उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमध्ये काय घडले ते पाहिले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर बसलेल्या महिला खेळाडूंना कोणी विचारले? केवळ संसदेत उभे राहून मसीहा म्हणवून घेतल्याने फरक पडत नाही, तर तसे करून दाखवावे लागते, अशा शब्दात काँग्रेस सरचिटणी प्रियांका गांधी पीएम मोदींसह भाजपवर हल्ला चढवला. आम्हाला आश्चर्य वाटले की अचानक हे अधिवेशन का बोलावले गेले? कोणालाही मसुदा माहित नव्हता. हे एक प्रकारचे षडयंत्र होते की महिलांच्या नावावर आरक्षण आणून स्वतःची सत्ता कायमस्वरूपी कशी टिकवता येईल. हे विधेयक महिलांसाठी नव्हते, तर ते पुनर्रचनेसाठी होते, असा टीका त्यांनी केली. 

महिलांच्या माध्यमातून सत्तेत राहण्याचा कट

प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजप म्हणतेय की हा 'काळा दिवस' आहे. त्यांच्यासाठी तो काळा दिवस असेलच, कारण पहिल्यांदाच त्यांना असा मोठा धक्का बसला आहे जो बसणे गरजेचे होते. आता पीआर आणि मीडियाबाजी चालणार नाही, जनतेचा विश्वास उडाला आहे.  इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जागांच्या संख्येवर 'फ्रीज' लावला होता कारण त्यांना उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये फूट पाडायची नव्हती. जर सरकारने पुनर्रचनेद्वारे दक्षिण भारतातील आणि छोट्या राज्यांचे वजन कमी केले, तर देशात मोठे संकट निर्माण होईल. आम्ही याच्याशी सहमत होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. 

घटनादुरुस्ती विधेयक हा एक कट होता

त्यांनी सांगितले की, हा संपूर्ण कट रचला गेला कारण सत्तेत राहायचे होते. ते आता होणार नाही; मतदारसंघ पुनर्रचना 2029 पर्यंत होणार नाही. हे महिलांच्या नावावर केले जात होते, जेणेकरून त्यांना सत्तेत राहण्याचे स्वातंत्र्य मिळेल. केंद्र सरकारला वाटले की जर हे विधेयक मंजूर झाले, तर ते जिंकतील. जर तसे झाले नसते, तर ते प्रत्येक विरोधी पक्षनेत्याला महिला-विरोधी सिद्ध करून महिलांचे तारणहार बनले असते. हा महिलांचा प्रश्न नव्हता, तर मतदारसंघ पुनर्रचनेचा होता. विरोधी पक्षाने निषेध केला याचा मला आनंद आहे. हा त्यांच्यासाठी काळा दिवस आहे, कारण हे कसे घडले याने त्यांना धक्का बसला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या