Wrestler Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पीटी उषा (PT Usha) यांनी टीका केली. त्यावर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शुक्रवारी (28 एप्रिल) प्रतिक्रिया दिली. प्रियांका म्हणाली की, आम्हाला आमच्या महिला खेळाडूंसाठी एकत्रितपणे बोलण्याची गरज आहे. 


पीटी उषा यांनी गुरुवारी (27 एप्रिल) कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत बोलताना म्हटलं की, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडे लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी एक समिती आहे. रस्त्यावर उतरण्याऐवजी ते (आंदोलक पैलवान/कुस्तीपटू) आधी आमच्याकडे येऊ शकले असते, पण ते आयओएमध्ये आलेच नाहीत. केवळ कुस्तीपटूंसाठीच नाही तर खेळासाठीही ते चांगलं नाही. त्यांनी थोडी शिस्तही बाळगली पाहिजे. पैलवानांच्या निषेधामुळे देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचंही पीटी उषा बोलताना म्हणाल्या होत्या. 






खेळासाठी चांगलं नाही : पीटी उषा 


पीटी उषा यांना विचारण्यात आलं होतं की, आयओए कुस्तीपटूंशी संपर्क साधेल का? कारण ते त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. तसेच, ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्याला उत्तर देताना पीटी उषा म्हणाल्या की, "थोडी शिस्त असावी. रस्त्यावर उतरण्याऐवजी त्यांनी आधी आयओएमध्ये यायला हवं होतं. पण ते आमच्याकडे आलेच नाहीत. हे खेळासाठी चांगले नाही."


पीटी उषा यांच्या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "लैंगिक छळाचे आरोप असलेले खासदार पळून जातात, तर पीडितांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा देशाची प्रतिमा मलीन होते. पुढे बोलताना प्रियंका म्हणाल्या की, "मला माफ करा मॅडम की, आपण आपल्या खेळाडूंसाठी बोललं पाहिजे. आपण त्यांच्यावर प्रतिमा मलीन केल्याचा आरोप लावू नये. खेळाडू आपल्या देशाला नावलौकिक मिळवून देतात आणि त्यांचा अभिमान असायला हवा." 


पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील : कुस्तीपटू विनेश फोगाट 


कुस्तीपटू विनेश फोगाटनं पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. आपण संविधानानुसार जगतो आणि स्वतंत्र नागरिक आहोत, असं विनेश म्हणाली. आपण कुठेही जाऊ शकतो, आम्ही बाहेर रस्त्यावर बसलो आहोत तर काहीतरी कारण असेलंच ना? आमचं कोणी ऐकलं नाही, यामागेही काहीतरी कारण असावं, मग ते आयओए असो वा क्रीडा मंत्रालय. फोगट म्हणाली की, तिनं पीटी उषा यांना फोनही केला होता, पण त्यांनी फोनही उचलला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Wrestlers Protest: "आमची तेवढीही लायकी नाही?"; क्रिकेटर्सचा सपोर्ट न मिळाल्यामुळे विनेश फोगाट भावूक