Ram Mandir Pran Pratistha Special Anushthan : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रतिष्ठापनेसाठीचं (Pran Pratishtha) 11 दिवसांचं अनुष्ठान नाशिकच्या भूमीवरून सुरू करणार आहेत. 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अनुष्ठान करणार असून त्याची सुरुवात आज नाशिकमधून करणार आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक साधू संत, विद्वानांनी सांगितलेल्या 'यम नियमांचे' पालन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी  11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार आहे, ज्याला आजपासून सुरुवात होत आहे.


पंतप्रधान मोदींचं 11 दिवसांचं खास अनुष्ठान


या संदेशामध्ये पंतप्रधाम मोदी यांनी म्हटलं आहे की, "अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला फक्त 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की मी देखील या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी भारतातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने मला निर्माण केले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठान सुरु करत आहे." असं म्हटलं आहे.


पंतप्रधान मोदींचा खास संदेश






रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी


अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लाची (Ramlalla) प्रतिष्ठापना (Pran Pratishta) सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 15 जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात होणार आहे. 16 जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भगवान रामाची मूर्ती बालस्वरुपात साकारण्यात आली आहे. या मूर्तीची उंची 51 इंच आणि वजन 1.5 टन आहे.


15-22 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरातील वेळापत्रक (Ram Mandir inauguration 2024 full schedule)



  • 15 जानेवरी 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपतात. गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती म्हणजेच श्री रामाच्या बालस्वरूपाची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

  • 16 जानेवारी 2024 : या दिवसापासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीही सुरू होतील.

  • 17 जानेवारी 2024 : या दिवशी रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. 

  • 18 जानेवारी 2024 : या दिवसापासून अभिषेक विधी सुरू होईल. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा होतील.

  • 19 जानेवारी 2024 : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल.

  • 20 जानेवारी 2024 : राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे. वास्तुशांती विधी होईल.

  • 21 जानेवारी 2024 : या दिवशी, यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला  125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल. 

  • 22 जानेवारी 2024 : या दिवशी मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे.

  • 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.