Prime Minister Narendra Modi : काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी महिला आरक्षण विधेयक 2026 ला विरोध करुन पाप केले आहे. महिला त्यांना कधीच माफ करणार नाहीत, अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेसने देशाचे मोठे नुकसान केले आहे. कारण प्रत्येक सुधारणेला काँग्रेसचा विरोध असतो. जनता त्यांना करारा जवाब देईल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. महिला आरक्षण विधेयकाचा विषय हा क्रेडीटचा नव्हता, तर देशातील निम्म्या लोकसंख्येला त्यांचा अधिकार देण्याचा होता असेही ते म्हणाले. संसदेत महिला आरक्षण विधेयक पास झालं नाही याचा अर्थ आम्ही हरलो नाही. आमचा संकल्प कायम आहे. आम्ही महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देणार असल्याचे पंत्प्रधान म्हणाले. 

Continues below advertisement

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संंबंधित 131 वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत आपली भूमिका मांडली. काँग्रेसने इतिहास रचण्याची आणि महिलांच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली असं नरेंद्र मोदी म्हणाले. आज भलेही हे विधेयक पास करण्यासाठी 60 टक्के बहुमत आमच्याकडे नसेल, परंतु देशातील कोट्यवधी महिलांची आम्हाला साथ आहे. महिलांच्या अधिकारांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करू. आमचा विश्वास दृढ आहे. आम्ही फक्त त्या वेळेची वाट पाहतोय. काल आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणजे आमचा पराभव झाला असं नाही. आमचा प्रयत्न थांबणार नाही असे ते म्हणाले.

महिला आरक्षण विधेयक हे सगळ्या राज्यांसाठी एक संधी होती

काँग्रेसने देशात फूट पाडण्याचे प्रयत्न केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महिला आरक्षण विधेयक हे सगळ्या राज्यांसाठी एक संधी होती. बील पास झाल्यानंतर सगळ्याच राज्यांची सीटे वाढणार होती. पण काँग्रेस आणि त्यांचया सहयोगी पक्षांनी सगळ्यांना धोका दिला आहे. कोणत्याही सुधारणेला काँग्रेसने अडचणी आणण्याचे काम केले. वन नेशन वन इलेक्शनला विरोध केला. 370 ला विरोध केला, जीएसटीला विरोध केल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

Continues below advertisement

काँग्रेसला जनता करारा जवाब देईल

काँग्रेसने आपल्या शेजारी असणाऱ्या देशांबरोबर सीमावाद निर्माण केलाय. पाकिस्तानसोबत पाणी वाटपावरुन वाद, ओबीसी आरक्षणावरुन वाद, काँग्रेसने पेन्शनचा मुद्दा रखडवला आहे. काँग्रेसने देशाचे मोठे नुकसान केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसला जनता करारा जवाब देईल. महिला आरक्षण विधेयकाला ज्या पक्षांनी विरोध केला त्यांना देशातील महिला लक्षात ठेवतील असे पंतप्रधान म्हणाले. ज्यांनी विरोध केला त्याची सजा त्यांना मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Narendra Modi : काँग्रेसने महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार; नरेंद्र मोदींची टीका