Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत (Ayodhya) भव्य-दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी पुण्यपावन देवभूमी अर्थात अयोध्यानगरीत डोळ्यांचं पारण फेडेल असा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. जगभरातील लाखो भविकांनी याचि देही, याचि डोळा हा अमृतसोहळा पाहिला. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळा संपन्न झाल्यानंतर उद्या (25 नोव्हेंबर 2025 रोजी) श्री राम मंदिरात होणाऱ्या ध्वजारोहण समारंभासाठी अयोध्या नगरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. अशातच आता आपण राम मंदिराबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया.
राम मंदिराचं वैशिष्ट्य काय?
-राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं गेले आहे.
- मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) 380 फूट, रूंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.
-मंदिर तीन मजली आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील
मुख्य गाभाऱ्यात प्रभु श्रीरामाचं बालरुप मूर्ती असेल. तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार आहे.
- मंदिरात 5 मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप आहेत.
- खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती असणार आहेत.
-सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश करता येतो
- मंदिराच्या चारही बाजूंना आयातकार तटबंदी परकोटा आहे. चारही दिशांना याची एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट आहे.
- तटबंदीच्या चारही कोनांना सूर्यदेव, आई भगवती, गणपती, भगवान शिव यांची मंदिरं तर उत्तरेला अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर आहे.
- मंदिराजवळ पौराणिक सीताकूप आहे. ही एक विहीर आहे, याच विहिरीतून आजही थोडं पाणी श्रीराम यांच्या रोजच्या नैवेद्यासाठी वापरलं जातं
- इथे सप्तर्षी मंदिरांची निर्मिती केली गेली आहे. ज्यात महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांचा समावेश आहे.
-दक्षिण-पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे, सोबतच राम सेतूच्या उभारणीत आपला वाटा देणाऱ्या खारु ताईची मूर्तीही पाहायला मिळते.
- मंदिरात लोखंडाचा अथवा स्टील चा वापर केला गेलेला नाही. जमिनीवर काँक्रीटीकरणही करण्यात आलेलं नाही.
- मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे.
- मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा २१ फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे.
-मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे.
-मंदिराचं बांधकाम नागर शैली मध्ये केलं गेलं आहे.
- चंद्रकांत सोमपुरा यांनी या मंदिराचं डिजाईन तयार केलं आहे.
अयोध्येतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदल
अयोध्येतील श्री राम मंदिरात २५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाच्या तयारीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलली जात आहे. या गर्दीच्या लग्नाच्या हंगामात, अयोध्येला जाणाऱ्यांनी त्यांचे मार्ग आधीच तपासावेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून पौष महिन्याच्या अखेरीपर्यंत, अनेक भागात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आणि पास असलेल्या वाहनांशिवाय सर्व वाहनांवर कडक निर्बंध लादले जातील.