अयोध्या : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज उत्तर प्रदेश दौऱ्याच्या चौथ्या दिवशी अयोध्येत आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी अयोध्येतील रामकथा पार्कचे उद्घाटन केले आहे. आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले, की रामाशिवाय अयोध्या नाहीत, अयोध्या आहे जिथं राम आहे. भगवान राम या शहरात कायमचे विराजमान आहेत, म्हणून हे ठिकाण खऱ्या अर्थाने अयोध्या आहे. अयोध्येचा शाब्दिक अर्थ असा की ज्याच्याशी लढणे अशक्य आहे.
रामकथा पार्कच्या उद्घाटनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "अयोध्येतील या रामकथा पार्कमध्ये तुमच्या सर्वांमध्ये येऊन मला आनंद झाला. रामकथेचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे. भारतीय जीवन मूल्यांचे आदर्श आणि उपदेश रामायणातील शिकवण आहे. रामायण कॉन्क्लेव्ह आयोजित करून कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून रामायण लोकांपर्यंत नेण्यासाठी आज उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मोहिमेसाठी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो."
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आता दुपारी 2.35 ते 3.15 या वेळेत हनुमानगढी दर्शन आणि रामलल्लाचे दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी 3.40 वाजता विशेष ट्रेनने अयोध्या जंक्शनवरून लखनौसाठी रवाना होतील. सायंकाळी 6 वाजता लखनौमधील चारबाग रेल्वे स्टेशनवर पोहोचतील आणि नंतर विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत.