नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल आणि नौदल देशाची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत. तसेच शत्रूला उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देश कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, सियाचीन आणि गलवान खोऱ्यात -50 ते -60 अंश सेल्सिअस तापमान असतं. जैसलमेरमध्ये 50 अंशांपेक्षा अधिक उन्हात जवान उभे असतात. पण तरीही जवान भारताच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे.
प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि कोविडची आपत्ती असूनही आपल्या शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात शेती उत्पन्न घेतले आहे. भारत देश नेहमीच आपल्या शेतकर्यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असेल.
सर्व शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान आहे. कोरोना काळात अहोरात्र काम करून शास्त्रज्ञांनी देशासाठी कोरोना लस उपलब्ध करून दिली. यासाठी त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे. सध्या लसीकरणाची मोहिम सुरू आहे. अत्यंत कमी वेळात लस निर्मितीचे महत्त्वाचे कार्य करून इतिहास घडवला आहे., असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली आहे. उत्सवातील मागणी आणि अर्थव्यवस्थेच्या वेगामुळे जीएसटी कलेक्शन डिसेंबरमध्ये वाढून 1 लाख 15 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
संबंधित बातम्या :