Rahul Gandhi on Gas: आज 1 मे पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून, त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांचा ताण वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या ऊर्जा किमती आणि पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील गॅसच्या दरांवर होत आहे. तथापि, घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर स्थिर आहेत.
व्यावसायिक सिलेंडर एकाच वेळी ₹993 ने महाग झाले
मे महिन्याच्या सुरुवातीबरोबरच, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना आज सकाळी मोठा धक्का बसला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी 1 मे रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल ₹993 ची वाढ केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकाच वेळेस झालेली दरवाढ मानली जात आहे. इंडियन ऑइल (IOC) ने जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, दिल्लीतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल ₹९९३ ची वाढ झाली आहे. या बदलानंतर, दिल्लीत एका सिलेंडरची किंमत आता ₹२,०७८.५० ऐवजी ₹३,०७१.५० झाली आहे. त्याचप्रमाणे, मुंबई आणि कोलकातामध्येही दरात लक्षणीय वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांवर दबाव येऊ शकतो.
राहुल गांधी यांची भीती खरी ठरली
दरम्यान, 28 एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, निवडणुकीचा दिलासा संपला असून महागाईचा गरमी तयार झाली आहे. 29 एप्रिलनंतर पाहाच, पेट्रोल, डिझेल सर्व महाग होईल. जेव्हा तेल स्वस्त होतं तेव्हा मोदी सरकारने फायदा ठेवला. आता महाग आहे, तर बोझा आपल्यावर टाकणार, स्वस्तातून लूट करणारे सरकार- जनतेला फक्त महागाईचा मार.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नाही
सुदैव म्हणजे व्यावसायिक सिलेंडर महाग झाले असले तरी, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत 4.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर अजूनही ₹916 या जुन्या दराने उपलब्ध आहे. ही मध्यमवर्गासाठी दिलासादायक बातमी आहे, कारण त्यांच्या खर्चावर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. घरगुती गॅसच्या दरात वाढ युद्ध सुरु होताच 7 मार्च रोजी झाली होती.
सलग तिसऱ्या महिन्यात दरात ₹1,303 ची वाढ
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यापासून 19-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे.
- 1 मार्च रोजी दरात ₹114.50 ची वाढ झाली.
- 1 एप्रिल रोजी ₹195.50 ची वाढ झाली.
- 1 मे रोजी ₹993 ची मोठी वाढ झाली.
- या तीन महिन्यांत, 19-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात एकूण ₹1,303 ची वाढ झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
