Lalu Yadav on Rahul Gandhi: सध्या भाजपविरोधात (BJP) विरोधकांनी एकीची हाक दिली आहे. आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही विरोधकांची साथ दिली आहे. अशातच गुरुवारी हेल्थ चेकअपसाठी लालू प्रसाद यादव पाटण्याहून दिल्लीला (Delhi News) पोहोचले. यावेळी त्यांनी 2024 मध्ये विरोधकांकडून पंतप्रधान (Prime Minister) पदासाठीचा चेहरा कोण? याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याला बायको नाही, त्याला पंतप्रधान पदाची संधी देवू नये, असं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. 


लालू प्रसाद यादव यांना विचारण्यात आलं की, विरोधकांकडून पंतप्रधान पदासाठीचा चेहरा कोण असेल? विरोधकांच्या बैठकीत तुम्ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सल्ला दिला होता की, राहुल गांधीनं बोहल्यावर चढलं पाहिजे. तुमचं हे वक्तव्य म्हणजे, तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान पदासाठीचा चेहरा मानता, हेच सूतोवाच होतं का? यावर बोलताना लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं की, "ज्याला बायको नाही, त्याला पंतप्रधान पदाची संधी देवू नये. पत्नीशिवाय पंतप्रधान निवासस्थानी राहणं चुकीचं आहे. हे आता थांबलं पाहिजे..." तसेच, पुढे बोलताना 2024 च्या निवडणुकीत विरोधकांना किती जागा मिळतील असं विचारल्यावर, किमान 300 जागा मिळतील, असंही लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं. 






राहुल गांधी यांनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ.... विरोधी पक्षनेत्यांच्या स्टेजवरुनच लालूंनी केलेला आग्रह


पाटण्यात 23 जून रोजी विरोधी पक्षांची महाबैठक पार पडली होती. यावेळी बैठकीच्या स्टेजवरुनच लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींकडे लग्न करण्याचा आग्रह केला होता. लालू प्रसाद यादव म्हणाले की, "राहुल गांधी चांगलं काम करत आहेत. भारत जोडोच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण देश पालथा घातला. राहुल गांधी यांनी लोकसभेतही चांगलं काम केलं आहे. राहुल गांधी यांनी लग्न करावं हा आमचा सल्ला त्यांनी मानला नाही. त्यांनी लग्न करावं, अजूनही वेळ गेली नाही. राहुल गांधी दुल्हा बने, हम बाराती बन जाएंगे."


मोदींच्या पाठवणीची तयारी करतोय : लालू प्रसाद यादव 


हेल्थ चेकअपला जाणाऱ्या लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर निशाणा साधण्याची संधीही सोडली नाही. ते म्हणाले की, "मी चेकअपसाठी दिल्लीला जातोय. तिथून परतल्यावर विरोक्षी पक्षांच्या बैठकीसाठी बंगळुरूला जाणार आहे. नरेंद्र मोदींच्या पाठवणीची तयारी करायची आहे. माझ्या येण्यानं आता भाजपची चिंता आणखी वाढली आहे." तसेच, यावेळी बोलताना त्यांनी भाजप विरोधात एकजूट केलेला विरोधी पक्ष 2024 मध्ये 300 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावाही लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. 


लालू यादव काय म्हणाले शरद पवारांवर?


लालू यादव यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, शरद पवार हे ताकदवान व्यक्ती आहेत. ते निवृत्त होणार नाहीत. त्यांचं वय झालं असलं तरी ते राजकारणातून संन्यास घेणार नाहीत. राजकारणात कोणीही निवृत्त होत नाही. तसं पाहायला गेलं तर, अजित पवार यांचा तसा फारसा प्रभाव नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अजूनही वेळ गेली नाही, राहुल गांधी यांनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ.... विरोधी पक्षनेत्यांच्या स्टेजवरच लालू प्रसादांचा आग्रह