पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार!
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2016 07:49 AM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान आज संध्याकाळी 5 ते 6 च्या सुमारास देशाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान काळ्या पैशांविरोधातील लढाई आणि नोटाबंदीसंबंधित काही मोठ्या घोषणा करु शकतात.